३६३ पैकी ३०० नागरिक सहभागी, ४६ प्रकरणांची तडजोड
शिरूर (अरुणकुमार मोटे: शिरूर तहसिल कार्यालयात आयोजित महसूल लोक अदालतीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद लाभला. तहसील स्तरावर नोंदणीकृत ३६३ प्रकरणांपैकी तब्बल ३०० नागरिकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली प्रकरणे मांडली. यामधून एकूण ४६ प्रकरणांचा यशस्वीपणे निपटारा करण्यात आला असून, ही सर्व प्रकरणे आपसी सहमतीने तडजोडीतून निकाली काढण्यात आली.
निपटार्यात सामील झालेल्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील कलम १५० अंतर्गत ३३ प्रकरणे, कलम १५५ अंतर्गत १० प्रकरणे, मामलेदार कोर्ट ऍक्ट अंतर्गत कलम ५ मधील २ प्रकरणे आणि अतिक्रमण संदर्भातील कलम १३८ अंतर्गत १ प्रकरणाचा समावेश होता. प्रकरणे निकाली काढण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक संवाद साधण्यात आला आणि त्यातून तडजोडनामा करून समाधानकारक निपटारा करण्यात आला.
या लोक अदालतीस तहसीलदार बाळासाहेब मस्के,म महसुल नायब तहसीलदार प्रकाश मुसळे, तसेच महसूल विभागाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. प्रकरणांवर कार्यवाही करताना प्रत्येक अर्जदारास न्याय मिळावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा सजग राहिली होती.
लोक अदालतीमुळे अनेक जुन्या आणि प्रलंबित प्रकरणांना गती मिळाली असून, नागरिकांनी देखील या प्रक्रियेबाबत समाधान व्यक्त केले आहे. यामुळे महसूल खात्याच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि लोकाभिमुखता अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
प्रलंबित राहिलेल्या इतर प्रकरणांवरही टप्प्याटप्प्याने सुनावण्या घेऊन न्याय देण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी स्पष्ट केले. नागरिकांच्या सहकार्याने महसूल लोक अदालतीचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यात आला आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…