मुख्य बातम्या

शिरुर; शिक्षकाचे अपहरण, गावोगावी फिरवत, बेदम मारहाण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील संविदणे येथे राहणाऱ्या तरुण शिक्षकावर १२ जणांच्या टोळीने घरात घुसून हल्ला करत त्याचे अपहरण केल्याची संतापजनक घटना २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. आरोपींनी शिक्षकाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गावाबाहेर नेले, तेथे मारहाण केली आणि पुन्हा गावाच्या चौकात आणुन हॉकीस्टिक व लाकडी दांड्यांनी बेदम चोप दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. जखमी शिक्षक नितीन अशोक चव्हाण (वय २९) हे सध्या संविदणे (ता. शिरुर, जि. पुणे) येथे वास्तव्यास असुन मूळचे पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथील आहेत.

आरोपीची घरात घुसून दहशत…

शिरुर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, दि २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायं ५:३० ते ६:२० दरम्यान माउली गोसावी, दिनेश उचाळे, अक्षय गोसावी, यश गोसावी, रोहित जगदाळे, तन्मय रोडे, अथर्व काळे, वरद काळे, दिपक गोसावी, नंदू कुंभार, नवनाथ बोऱ्हाडे, शुभम कुंभार (सर्व रा. कवठे येमाई, ता. शिरुर, जि. पुणे) या सर्वांनी चव्हाण यांच्या घरात घुसून त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांचे हातपाय पकडून जबरदस्तीने त्यांना दुचाकीवर बसवण्यात आले.

कवठे येमाई गावाच्या हद्दीत इचकेवाडी येथील रेणुका माता चारी परिसरात नेऊन त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपींनी त्यांना परत संविदणे गावच्या चौकात आणले. तेथे किमान नऊ जणांनी हॉकीस्टिक व लाकडी दांड्यांनी तसेच सर्वांनी मिळुन लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. हा प्रकार पाहून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुन्ह्याची उशिरा नोंद …?

या प्रकरणी गुन्हा २५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.१० वाजता दाखल करण्यात आला. दिवसाढवळ्या अपहरणासारखा प्रकार घडूनही गुन्हा रात्री उशिरा नोंद झाल्याने पोलिसांच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार हे करत आहेत.

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा…?

घरात घुसून शिक्षकाला उचलणे, गावाबाहेर नेऊन मारहाण करणे आणि पुन्हा चौकात सार्वजनिकरित्या चोप देणे हा प्रकार केवळ मारहाण नसुन गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. यापुर्वीही कवठे येमाई परिसरात एका सामाजिक कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाली होत. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करणारे आरोपी मात्र गंभीर गुन्हे दाखल असतानाही सार्वजनिक कार्यक्रमात उघडपणे फिरत होते. त्यानंतर परत त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.

शिरुरला सिंघम अधिकाऱ्याची गरज…?

सविंदणे गावातील शिक्षकाला सिनेस्टाईल पद्धतीने मारहाण करत आरोपीनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्षकावर झालेल्या या हल्ल्यामुळे शिक्षण क्षेत्रातही संतापाची लाट उसळली आहे. शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या एका शिक्षकाचे अपहरण करुन मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांचा धाक आहे की नाही…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनला सिंघम अधिकाऱ्याची गरज असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

SIR मोहिमेवर काँग्रेस आक्रमक; दावे-हरकतींसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढीची मागणी

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…

35 मिनिटे ago

साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना; एफआरपी वेळेत देण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…

2 तास ago

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

2 तास ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

2 तास ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

2 तास ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

3 तास ago