न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील आंबळे येथे विवाहित महिलेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन मुलीला हिसकावून घेण्याची आणि पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी दिल्याचा, तसेच चारचाकी वाहनाच्या कर्जफेडीसाठी माहेरुन १० लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप विवाहितेने तक्रारीत केला आहे.
या प्रकरणी गायत्री विकी पवार (वय २५, रा. आंबळे, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सन २०२० पासून आजपर्यंत सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक त्रास, शिवीगाळ, मारहाण आणि दमदाटी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुलगा होत नसल्याचे कारण; मुलीला हिसकावून घेण्याची धमकी
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन त्यांना त्रास देण्यात आला. तसेच त्यांच्या मुलीला हिसकावून घेण्याची आणि पतीचे दुसरे लग्न लावून देण्याची धमकी देण्यात आली. पतीने नवीन चारचाकी वाहन घेतल्याने त्याच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्याची मागणी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच पतीविरुद्ध यापुर्वी घडलेल्या एका प्रकरणाचा राग मनात धरुन फिर्यादीला एका मुलीला भेटण्यास व तिला मारहाण करण्यास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यास नकार दिल्यानंतर फिर्यादीची मुलगी शर्वरी हिला हिसकावून घेऊन फिर्यादीला घराबाहेर काढल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पाच जणांविरुद्ध गुन्हा; पुढील तपास सुरु…
या प्रकरणी पती विकी रामदास पवार (वय २८), सासू मीना रामदास पवार (वय ५५), दिर किरण रामदास पवार (वय ३३), जाऊ शिवानी किरण पवार (वय २७) आणि नणंद निलम विजय साळुंके (वय ३०), सर्व रा. आंबळे, ता. शिरुर, जि. पुणे, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार पुढील तपास करत आहेत.
शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त
शिरुर तालुक्यात मारहाणीच्या दोन घटना; जागेचा वाद आणि शेळ्या-मेंढ्या चारण्यावरुन राडा
शिरुर तालुक्यात वीजचोरीचे दोन गुन्हे दाखल; महावितरणला १३.६७ लाखांचा फटका
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत गावठी हातभट्टीची…
११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला शासनाची मंजुरी; ९८ जणांवर गुन्हे, हजारो गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याची प्रतीक्षा…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात जागेच्या वादातून तसेच शेळ्या-मेंढ्या चारण्याच्या कारणावरुन मारहाणीच्या दोन स्वतंत्र घटना…
शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीजमीटरमध्ये छेडछाड करुन वीजचोरी केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या…