मुख्य बातम्या

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एका माजी सैनिकाची पत्नी कंपनीत भागीदार असताना बनावट कागदपत्रे बनवुन तिचा राजीनामा घेत तिला कंपनीच्या भागीदारीतुन काढुन टाकण्यात आले असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असुन याबाबत रेश्मा राहुल वाळके (वय ३७) रा. करडे ता. शिरुर, जि पुणे यांनी शिरुर पोलिस स्टेशन येथे चार जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

 

याबाबत रेश्मा वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे पती राहुल वाळके पती हे निवृत्त माजी सैनिक असुन त्यांनी डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare feeds india Private Limited) हि कंपनी दिनांक २० सप्टेंबर २०१८ मध्ये तीन भागीदारांसोबत स्थापन केली होती. सदर कंपनी स्थापन करते वेळी १) राहुल साहेबराव वाळके २) दिनेश भास्कर वाळके 3) मधुकर गणपत बांदल हे तिघेजण डायरेक्टर होते. सदरील कंपनी स्थापन करत असताना सदर कंपनी स्थापन केलेली ७/१२ मिळकत ही कंपनीचे पुर्वीचे संचालक दिनेश वाळके तसेच मधुकर बांदल याचे नावे होती.

 

दि ६ डिसेंबर २०१९ रोजी कंपनीमध्ये जितेंद्र सुभाष पवार यांना सर्वांच्या संमतीने संचालक म्हणुन समाविष्ट करणेत आले. तसेच दिनेश वाळके यांना त्यांच्या नावावरील जमीन विक्री करावयाची असल्याने दिनेश वाळके यांची जमीन संभाजी दगडु वाळके यांना खरेदी दिली असल्यामुळे सदरील कंपनीचे तत्कालीन संचालक दिनेश वाळके, मधुकर बांदल तसेच राहुल वाळके यांनी कंपनीमधुन स्वतःहून राजीनामा दिला होता.

 

त्यानंतर नविन संचालक संभाजी दगडु वाळके व जितेंद्र सुभाष पवार यांना कंपनीचे संचालक म्हणून समाविष्ट केले होते. दि १२ सप्टेंबर २०२२ रोजी जितेंद्र पवार यांनी सदरच्या कंपनीचा राजीनामा दिला. जितेंद्र पवार यांनी राजीनामा दिल्यावर त्यांच्या जागी रेश्मा वाळके यांना या कंपनीच्या संचालिका म्हणुन ५० टक्के हिश्यात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासुन सदर कंपनीमध्ये रेश्मा वाळके या संचालिका म्हणुन कामकाज पाहत आहेत.

 

या कंपनीचे कामकाज सन २०२२ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत खूप चांगल्या प्रकारे चालु झाले होते व कंपनीस चांगल्या ऑर्डर मिळालेल्या होत्या. त्यामुळे कंपनीचे संचालक संभाजी वाळके, त्यांचा मुलगा सचिन संभाजी वाळके आणि मुलगी प्रियांका संभाजी वाळके यांनी सर्व कंपनी आपल्याच ताब्यात यावी या लालचेपोटी रेश्मा वाळके यांना कंपनीमधून काढून टाकण्यासाठी त्यांनी हालचाली चालू केल्या.

 

डब्ल्यू स्क्वेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Wsquare feeds india Private Limited) या कंपनीची बनावट कागदपत्रे तसेच रेश्मा वाळके यांच्या राजीनाम्याची खोटया सहीची कागदपत्रे तयार करुन अफरातफर करत बदल झालेली सर्व कागदपत्रे कोणत्यातरी अनोळखी सदनी लेखापाल (CA) व (CS) यांच्या मार्फत रजिस्ट्रेशन ऑफ कंपनी (ROC) ला ऑनलाइन अपलोड करुन रेश्मा वाळके यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता कंपनी मधुन त्यांचे सर्व अधिकार काढुन कंपनीच्या संचालक पदावरुन काढुन टाकुन त्यांच्या जागी प्रियांका संभाजी वाळके यांची संचालक म्हणुन नेमणुक करुन वाळके यांची आर्थिक फसवणुक केली आहे.

 

याबाबत रेश्मा वाळके आणि त्यांचे पती राहुल वाळके हे विचारणा करण्यासाठी गेलो असता “पुन्हा या कंपनीच्या आवारत दिसला तर तुम्ही दोघे परत कुठेच दिसणार नाहीत याद राख, माझ्या इतके कोणी वाईट नाही” असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने त्या दोघांनी संभाजी दगडु वाळके त्यांची मुलगी प्रियांका संभाजी वाळके आणि त्यांचा मुलगा सचिन संभाजी वाळके सर्व (रा. करडे,ता.शिरुर, जि. पुणे) तसेच एक अनोळखी सी ए (CA)आणी सी एस (CS) यांच्याविरुद्ध शिरुर पोलिस स्टेशन येथे कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके हे करत आहेत.

(क्रमश:)

शिरुर; उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊन फसवणुक

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला 

धक्कादायक; ५ ते ६ जणांच्या टोळक्याकडुन तरुणाचे अपहरण करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

10 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

16 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

16 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

17 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

17 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

17 तास ago