धक्कादायक; ५ ते ६ जणांच्या टोळक्याकडुन तरुणाचे अपहरण करुन लोखंडी रॉडने बेदम मारहाण

मुख्य बातम्या शिरूर तालुका

दौंड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यात ५ ते ६ जणांनी एका तरुणाला लोखंडी रॉड, लाथा बुक्यानी जबर मारहाण करुन मारहानीचा व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार  उघडकीस आला असुन नात्यातील तरुणीला मोबाईलवर संदेश पाठवल्याच्या संशयावरुन या तरुणाला बेदम मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

 

पानवली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता.२२) संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा गंभीर प्रकार घडला असुन या घटनेमुळे बीड सारख्या घटनेची पुनरावृत्ती दौंड मध्ये झाल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे. याप्रकरणी ६ जणांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पक्कड बोरावणे (वय २८) रा. पानवली ता. दौंड, जि. पुणे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

याप्रकरणी बोरावणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अक्षय भगवान भांड, निखील संतोश मखर, जालींदर महादू लेंडे, गोविंद बाबुराव पिंगळे, पप्पु भगवान लेंडे व विशाल भगवान भांड (रा. सर्वजण पानवली ता. दौंड) यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी अक्षय भांड याने आमच्याकडे लाईट नाही. डि पी ला लिंक टाकावी लागेल तर तु डी पी जवळ ये असे सांगितले. यावेळी बोरावणे हा एकटा चालत गेला. यावेळी त्या ठिकाणी वरील सर्व आरोपी हे उभे होते. अक्षय याने सचिनच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. व निखील मखर याच्याकडे दिला आणि तु माझ्या मेहुणीला मोबाईलवरुन मॅसेज का केला” असे विचारले. यावेळी सचिन याने मी जालींदर लेंडे यांना मॅसेज केला होता. तुम्ही गैरसमज करुन घेवु नका असे समजावले.

 

याचवेळी पप्पू लेंडे याने हातातील लोखंडी रॉड, अक्षय याने त्याचे हातात घेवून डावे पायाचे नडगीवर मारले. विशाल भांड व निखील मखर याने रॉड डोक्यात मारायला उगारला मात्र हातात हवेत झेलला त्यामुळे उजवे हाताचे अंगठ्या शेजारील बोटाला जबर मार लागला. त्यावेळी निखील मखर म्हणाला की, तुझा आज मर्डर करतो. यावेळी त्यांचे गाडीवर बसवले व त्यानंतर गोविंद पिंगळे याने लोखंडी रॉडने मारहान करून शिवीगाळ दमदाटी केली.

 

यावेळी सचिन बोरावणेला गाडीवर जबरदस्तीने बसवुन शिवतक्रार म्हाळुंगीकडे जाणाऱ्या डॅमजवळील फॉरेस्ट मध्ये घेऊन गेले. त्या ठिकाणी सर्वांनी शिवीगाळ दमदाटी करुन हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धमकावले की, तुला आता आम्ही आपल्या पानवलीचे चौकामध्ये नेणार आहे. तेथे मोबाईलवर तुझे व्हिडीओ शुटिंग करणार आहे. त्यामध्ये तु मॅसेज केलेचे मान्य करणार आहे आणि आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार देणार नाही असे धमकावले. त्यानंतर आरोपींनी पानवली चौकामध्ये नेऊन निखील मखर याने त्याचे मोबाईलचा व्हिडीओ कॅमेरा चालू करुन बोलण्यास भाग पडले व व्हिडीओ शुटिंग केले. त्यानंतर ते सर्वजन निघून गेले.

 

दरम्यान काही वेळाने घटनास्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी फिर्यादी यवत येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी फिर्यादी शिक्रापुर (ता. शिरुर) येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर मारहाणीत सचिन बोरावणे यांच्या मांडीचे, पायाचे नडगीचे हाड फॅक्चर झाले आहे. तसेच उजव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाचे हाड फॅक्चर झाले असुन मणक्यालाही मार लागला आहे.

 

याप्रकरणी सचिन बोरावणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन यातील चौघांना पोलिसांनी अटक केली असुन दोघेजण अद्याप फरार आहेत. या गुन्ह्यातील आरोपी भांड याची सख्खी बहिण पुणे शहर पोलीस दलात आहे. त्यामुळे दोन फरार आरोपींना अटक केली जाणार का…? याबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.

शिरुर; उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊन फसवणुक

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला 

शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी तर २ शेळ्या १ वासरू ठार