शिरुर; उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली पाच लाख रुपये घेऊन फसवणुक

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीस उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली बँक अकाउंट, फोन पे द्वारे तसेच रोख स्वरुपात एकुण ५ लाख ५ हजार रुपये घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी रवी मुलचंद पवार, अविनाश मूलचंद पवार दोघेही (रा.हनुमान खेडा ता. चाळीसगाव, जि.जळगाव) या दोघांविरोधात वैभव राघू पाठक (वय ३५) रा. कुकडी कॉलनी, पराग कारखाना, रावडेवाडी, ता. शिरुर, जि. पुणे. यांनी तक्रार केली आहे.

 

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभव राघू पाठक यांनी २० ऑगस्ट २०२२ तसेच २६ जानेवारी २०२५ या तारखेला रवी मुलचंद पवार आणि अविनाश मूलचंद पवार या दोघांना उस तोडणीसाठी मजुर देण्याच्या नावाखाली बँक अकाउंट, फोन पे द्वारे तसेच रोख स्वरुपात एकुण ५ लाख ५ हजार रुपये दिले होते.

 

परंतु ऑक्टोबर २०२२ मध्ये कारखाना चालु होण्याच्या वेळी रवी मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार यांच्याकडे उसतोड कामगार मिळणेबाबत विचारणा केली असता त्यांनी तक्रारदार यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. कारखाना सुरु होवुन सिझन बंद झाला तरी तक्रारदार यांनी वेळोवळी उसतोड कामगारांची मागणी करुनही रवी पवार आणि अविनाश पवार यांनी उसतोड कामगार दिले नाहीत.

 

रवी पवार आणि अविनाश पवार यांनी तक्रारदार वैभव पाठक यांच्याकडुन पैसे घेवुन ऊसतोड कामगार न पुरविता त्यांचा विश्वासघात केला. तसेच त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्याकडे वेळोवळी दिलेली रक्कम मागीतली असता ती रक्कम न देता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शिरुर पोलिसांनी वरील दोघांच्या विरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अनिल आगलावे करत आहेत.

शिरुर शहरात पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चोरांनी हिसकावला 

शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी तर २ शेळ्या १ वासरू ठार 

खुनाचा प्रयत्न करून एक महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीला परजिल्हयातुन ताब्यात घेत शिरुर पोलीसांनी ठोकल्या बेडया