मुख्य बातम्या

पिंपळे जगताप येथील दशक्रियेत तापले शिरुर-हवेलीचे राजकारण, सांत्वनपर भाषणात एकमेकांना काढले चिमटे

शिक्रापुर (तेजस फडके) सध्या शिरुर-हवेली मतदार संघात अनेकजण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे दशक्रिया विधी, लग्न समारंभ तसेच इतर कार्यक्रमांना राजकीय नेते हजेरी लावत आहेत. रविवार (दि २८) जुलै रोजी पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील माजी उपसरपंच शहाजी तांबे यांचे वडील किसनराव तांबे यांच्या दशक्रियेला शिरुर-हवेलीत आजी माजी आमदारांसह अनेक दिग्गजांनी हजेरी लावत सांत्वनपर भाषणात एकमेकांना चिमटे काढले.

 

या दशक्रिया विधीच्या वेळी निवेदक यांच्यासह भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांनी प्रदीप कंद यांच्यातर्फे श्रद्धांजली दिल्यावर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी माईक हातात घेत महेश ढमढेरे तसेच विश्वास ढमढेरे यांचा नामोल्लेख करुन स्व. श्रीकांत ढमढेरे ग्रामविकास अधिकारी असतानाच शहाजी तांबे उपसरपंच होते व त्यांचे पिंपळे गावच्या विकासातील योगदान सांगताना १५ वर्षापुर्वी ग्रामपंचायत आधी कौलाच्या खोलीतुन नंतर आरसीसी ईमारतीत आणत पहीला सिंमेंट रस्ता ग्रामपंचायतने स्वनिधीतुन केल्याचे दुःखीत कुटुंबियांचे सामाजिक व राजकीय योगदान सांगीतले.

 

इथुनच सांत्वन सभेत शिरुर-हवेलीचे राजकारण हळू हळू तापायला सुरवात झाली चंदन सोंडेकर यांच्यानंतर महेश अरविंद ढमढेरे शोकाकुलांचे सांत्वन केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे यांनी आवर्जून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यतर्फे श्रद्धांजली वाहत जुना ब्रिटिशांचा काळ पाहीलेली खडतर जीवन जगत आदर्श घालून दिलेली पिढी सरत चालल्याचे दुःख व्यक्त केले. माजी आमदार सुर्यकांत पलांडे यांनी सर्वच उपस्थित गावोगावीच्या नेत्यांचा नामोल्लेख करत आपला शिरुर तालुका जात धर्म न पहाता सर्वांनाच निवडणुकीत संधी देतो यांत धनगर, माळी, मराठा , नाईक, भटके विमुक्त सर्वांना जिल्हा परिषदेत पाठवायच काम तालुक्याने केले यांत पोपटराव गावडे, किसनराव भुजबळ आंधु महाराज, यांची आठवण सांगितली.

 

शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या सांत्वनपर भाषणावेळी पाऊस वाढल्याने दशक्रिया शेडच्या बाहेर उपस्थित महीला भगीनी भिजत असल्याने मी थोडक्यात बोलतो म्हणत “महारांजांच्या प्रवचनानंतर काही कार्यकर्तेच त्यांचे प्रवचन चालू ठेवतात” असे म्हणून आधिचे वक्ते चंदन सोंडेकर ते रवि काळे या सर्वांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही.

 

दशक्रिया विधीच्या या कार्यक्रमानंतर चहाच्या टपरीवर चहासोबतच आमदारांच्या सांत्वनपर भाषणाचा दाखला देत सणसवाडीच्या माजी उसरपंचाने सांगीतले की, दशक्रियेत आमदार पवारांनी महीला भिजत आहेत म्हणून थोडक्यात बोलतो म्हणत आधीच्या वक्त्यांना चिमटा काढला. पण मग दोनदा आमदार असताना मतदार संघात महीलांसाठी अधिकची दुसरी मोठी शेड का नाही बांधली…? अशी चर्चा उपस्थितांमधे रंगली.

शिरुर तालुक्यात शाळेसमोरील मोकळया पटांगणात मुक्त संचार करणारा आजारी बिबट्या जेरबंद

शिरुर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत कांदा व बाजरी पिकाची नोंद

शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago