क्राईम

शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास अटक…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरटयास शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

शिरूर तालुक्यातील शिकापुर पोलिस स्टेशन येथे दाखल गुन्हयातील फिर्यादी नवनाथ बाजीराव गुंडाळ,( रा. वढु बुद्रुक, ता. शिरूर, जि.पुणे) यांच्या घराचा दरवाजाचे कडी कोयंडा उचकटुन (दिनांक २४/०७/२०२४ रोजी ते दिनांक २७/०७/२०२४) रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील ४,१००/- रू. किंमतीचे घरातील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली होती. तसेच यापुर्वी देखील वढु बुद्रुक गावामध्ये २ दुकानामध्ये घरफोडी चोरी झाले बाबत शिकापुर पोलिस स्टेशन येथे गुन्हयाची नोंद होती. त्यामुळे दिपरतन गायकवाड, पोलिस निरीक्षक, शिकापुर पोलिस स्टेशन यांनी घरफोडीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेन्याबाबत गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांना सुचना दिलेल्या होत्या.

शिकापूर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराच्या मार्फत अज्ञात आरोपीचा शोध घेतला असता दत्ता साहेबराव फुलारे (वय १९, रा.वढु बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) याचा संशय पोलिसांना आला. सदर आरोपीस पोलिसांनी (सणसवाडी, ता. शिरूर, जि.पुणे) येथून ताब्यात घेवुन त्याचेकडे सखोल तपास केला असता, आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. आरोपीकडुन गुन्हयातील चोरीस गेलेल्या मालापैकी २३००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.ना.महेंद्र पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलिस अधीक्षक पुणे, प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली दिपरतन गायकवाड पोलिस निरीक्षक शिकापुर पोलिस स्टेशन, महेश डोंगरे पोलिस उपनिरीक्षक यांचेसह सफौ/जितेंद्र पानसरे, पोहवा/श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, पोना/विकास पाटील, रोहीदास पारखे, महेंद्र पाटील, शिवाजी चितारे, पोकॉ/जयराज देवकर, प्रतिक जगताप यांचे पथकाने केली आहे.

शिरूर तालुका! मैत्रिणीकडे जाणून येते असे सांगून गेलेली मुलगी घरी परतलीच नाही…

शिरूर शहरात जुगार खेळणाऱ्यांवर ४ जणांवर गुन्हा दाखल; पाहा नावे…

शिक्रापूर येथील चोरीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येने उडाली खळबळ…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

2 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

2 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

2 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

2 तास ago

महाराष्ट्रात डिजिटल प्रॉपर्टी कार्डची तयारी; मालमत्ता व्यवहार होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक.

मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…

2 तास ago

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…

2 तास ago