मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात शाळेसमोरील मोकळया पटांगणात मुक्त संचार करणारा आजारी बिबट्या जेरबंद…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील मलठण येथील गावठाणालगत असलेल्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात सोमवारी (ता २९) सकाळच्या सुमारास मुक्त संचार करणारा बिबट्या आढळून आला होता. त्यामुळे परीसरात मुलांसह नागरीकांमध्ये भिती निर्माण झाली होती. वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने तातडीने बिबट्याला जेरबंद केले आहे.

 

मलठण येथील गावठाणालगत असलेल्या शाळेसमोरील मोकळ्या पटांगणात भर सकाळी बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. परंतु काही वेळाने सदर बिबट्या ब-याच वेळ एकाच जागेवर बसुन राहील्याने वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी वनपाल गणेश म्हेत्रे, वन कर्मचारी हनुमंत कारकुड, रेस्क्यू टिम कर्मचारी ऋषिकेश विधाटे, जयेश टेमकर, राजेश वाळुंज, सुदर्शन खराडे, शुभम सिस्तार, सचिन गोडसे यांना घटनास्थळी पाठवले.

 

त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर सदर बिबट्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकाच जागी बसून राहिल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार रेस्क्यू टिमने अंदाजे साडेतीन वर्षे वयाच्या नर बिबट्याला जेरबंद केले. त्याला पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.

 

“मलठण येथे प्रकृती अस्वस्थ्य असलेला बिबट्या मोकळ्या पटांगणात आढळून आला. त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद करून, वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात दाखल केले आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांच्या मागणीनुसार पिंजरे लावून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे.”

प्रताप जगताप

वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरुर 

शिरुर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत कांदा व बाजरी पिकाची नोंद

शिरुर तालुक्यात तलाठी व मंडल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीत कांदा व बाजरी पिकाची नोंद

रांजणगाव येथील जल प्रदुषण करणाऱ्या MEPL कंपनीवर बंदी आणा खासदार डॉ अमोल कोल्हे यांची लोकसभेत मागणी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago