मुख्य बातम्या

मनसे शिरूरच्या वतीने विसर्जन घाटावर महाप्रसादाचे वाटप;  हजारो गणेशभक्तांनी घेतला लाभ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील शनी मंदिर विसर्जन घाटावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरूरच्या वतीने गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा सकाळी ८ वाजल्यापासून शुभारंभ झाला. तब्बल ५,००० हून अधिक गणेशभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

या सतत पाचव्या वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे गणेशभक्तांमध्ये समाधानाची भावना होती. मनसे कार्यकर्त्यांच्या या सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

या उपक्रमा मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामाजिक भान आणि जनतेशी असलेली नाळ दृढ करण्याचा उद्देश आहे. या उपक्रमाबाबत माहिती देतानामनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब सय्यद , शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे ,’आम्ही शिरूरकर फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बापू सानप, मनसे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे ,शहराध्यक्ष आदित्य मैडआणि शहर सचिव रवी लेंडे यांनी संयुक्तपणे सांगितले की, “गणेश भक्तांच्या सेवेसाठी आम्ही दरवर्षी हा उपक्रम श्रद्धेने व निस्वार्थपणे राबवत आलो आहोत. भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच आमचं यश आहे.”

विसर्जनाच्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक शिरूरमधील शिनी मंदिर विसर्जन घाटावर एकत्र येतात. त्यामुळे मनसेच्या या उपक्रमामुळे अनेकांना सकस व गरमागरम प्रसादाची सोय झाली.महाप्रसादाच्या वाटपासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते. स्वच्छता, शिस्त व आत्मीयता यामुळे या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

या उपक्रमाचे यंदाचे ५वे यशस्वी वर्ष होते.सकाळी ८ वाजता महाप्रसाद वाटपाला सुरुवात झाली.५,००० पेक्षा अधिक भक्तांनी घेतला प्रसादाचा लाभ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम,विसर्जन घाटावर गणेश भक्तांची विशेष गर्दी, शिस्तबद्ध व स्वच्छ नियोजनाने उपक्रम ठरला यशस्वी हे असेच उपक्रम भाविकांच्या सेवेसाठी दरवर्षी व्हावे, अशीच अपेक्षा शिरूरकरांनी व्यक्त केली.मनसेच्या या सामाजिक कार्यामुळे संघटनेचे स्थान स्थानिक पातळीवर अधिक मजबूत होत आहे, असे जाणकारांनी म्हटले आहे.

महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून विसर्जन घाटावर मोठ्या संख्येने गणेशभक्तांनी गर्दी केली होती. सर्व वयोगटातील लोकांनी शांततेत, रांगेत महाप्रसाद घेतला. भाविकांनी “ही परंपरा अबाधित ठेवावी, मनसेचे मनापासून आभार” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील वर्षीही अधिक व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविला जावा, अशी भावना शिरूरकरांनी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

42 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

47 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

53 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

57 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

7 तास ago