Leader
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या नाट्यमय घटनांनी शहराचे राजकीय तापमान शिगेला पोहोचले. महाविकास आघाडी, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांनी नगराध्यक्षपदासह सर्व २४ जागांवर स्वबळावर उमेदवारी दाखल केल्याने आगामी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत प्रथमच चार पक्ष प्रत्यक्ष पक्षीय चिन्हावर रिंगणात उतरल्याने तसेच अपक्ष उमेदवार ही मोठ्या प्रमाणावर असल्याने ही लढत शिरूरमध्ये पंचरंगी लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.
अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळी शहरभर महायुती संयुक्त लढेल अशी चर्चा होती. मात्र दुपारनंतर अचानक परिस्थिती पलटली आणि भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) व महाविकास आघाडी यांनी स्वतंत्रपणे सर्व जागांवर उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने पक्ष कार्यालये, गल्ल्या, चौकांमध्ये एकच राजकीय गोंधळ उडाला. इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालयात गर्दी करीत अर्ज भरण्यासाठी धावपळ केल्याचे दृश्य शहरभर पाहायला मिळाले. या निवडणुकीत चार प्रमुख पक्षाची प्रतिष्ठा थेट दावणीला लागली आहे. चारही बाजूंनी स्वतंत्र लढत जाहीर केल्याने व अपक्षांनी मोठ्या प्रमाणात फॉर्म भरल्याने नगरपरिषदेत कोणाचे वर्चस्व टिकते किंवा मोडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नगराध्यक्षपदासाठी एकूण ९ अर्ज, त्यापैकी ३ अवैध, असे ६ उमेदवार मुख्य रिंगणात राहिले आहेत. बहुतेक दावेदार महिला असल्याने यंदाची नगराध्यक्ष निवडणूक ‘महिला विरुद्ध महिला’ ठरणार आहे.
प्रमुख उमेदवार
अलका सुरेश खांडरे – महाविकास आघाडी (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
सुवर्णा राजेंद्र लोळगे – भाजप (माजी नगराध्यक्षा)
ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
रोहिणी किरण बनकर – शिवसेना (शिंदे गट)
वैशाली दादाभाऊ वाखारे – अपक्ष (माजी नगराध्यक्षा)
मनीषा कालेवार – अपक्ष
२२४ पैकी १९४ अर्ज वैध
नगराध्यक्षपद – ९ अर्ज (३ अवैध)
नगरसेवकपद – १९३ अर्ज (५ अवैध)
एकूण वैध अर्ज – १९४
जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चेनंतर जागा वाटपावर समाधान न झाल्याने भाजपा तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे आणि जिल्हा संपर्कप्रमुख धर्मेंद्र खांडरे यांनी सर्व जागांवर उमेदवारी भरण्याचे आदेश दिले. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही आमदार माऊलीआबा कटके यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली. या निर्णयानंतर उमेदवार अर्ज घेऊन निवडणूक कार्यालयात पोहोचण्यासाठी धावत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
महाविकास आघाडीही पूर्ण एकसंध असल्याचे स्पष्ट झाल्याने चौफेर लढतीची रणधुमाळी निश्चित झाली आहे. त्यातच अपक्ष उमेदवारांनी फॉर्म भरल्याने शिरूर नगरपरिषदेची लढत आता पंचरंगी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी माघारीची अंतिम तारीख २१ नोव्हेंबर असून त्यानंतर अंतिम पॅनल, पक्षीय मांडणी आणि थेट मुकाबला स्पष्ट होणार आहे. पक्षीय चिन्हावर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीत चार प्रमुख राजकीय पक्ष,अपक्षांचा वाढता प्रभाव,आघाड्यांतील अंतर्गत समीकरणे, नेत्यांची प्रतिष्ठा यामुळे शिरूर नगरपरिषद निवडणूक यंदा राज्यभर चर्चेत राहणार आहे.
शिरूर नगराध्यक्ष, नगसेवक निवडणूकीत पाच अर्ज अवैध, लक्ष आता माघारीकडे…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…
पुणे: पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी दारू प्रकरणाची शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती…