मुख्य बातम्या

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालणाऱ्या वाळू माफियांनी घोड धरण अक्षरशः ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातील अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी तीन वेळा फोडूनही वाळू माफियांचे वाळू चोरण्याचा सपाटा चालुच आहे.

याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने याबाबत वेळोवेळी सडेतोड बातम्या केल्या होत्या. त्यानंतर महसुल विभागाने कारवाई करत सलग तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या. त्यानंतर काही दिवसातच वाळू माफिया पुन्हा धरणात यांत्रिक बोटींच्या साह्याने वाळूची चोरी करतात. प्रशासनाकडून तीन वेळा कारवाई होऊनही वाळू माफिया त्यांना “जमत असेल तर थांबवून दाखवा” असे सरळसरळ आव्हान देत आहेत. त्यामुळे भविष्यात गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे.

या धरणातील वाळू उपसा केवळ बेकायदेशीरच नाही तर धरणाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण करणारा आहे. हे धरण पुर्णपणे मातीचे धरण असुन भविष्यात पाण्याच्या साठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तरीही काही स्वयंघोषित राजकीय पुढारी आणि वाळू माफियांच्या मिलीभगतीमुळे वाळू उपसा बेधडक सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

या बेकायदेशीर वाळू उपशामुळे घोड धरणाच्या कडेला राहणारे स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि पर्यावरणप्रेमींचा रोष वाढत असुन, “तीन वेळा बोटी फोडल्या तरीही माफिया थांबत नसतील, तर कुणाच्या आशिर्वादाने हा धंदा सुरु आहे…?” असा थेट सवाल ते प्रशासनाला विचारत आहेत. आता या माफियांवर खर्‍या अर्थाने कारवाई होणार का…? की घोड धरणातील वाळूचा ‘सोनेरी धंदा’ असाच सुरु राहणार…? या प्रश्नावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

(क्रमश:) 

Video; घोड धरण नक्की कुणाच्या मालकीच…? पाटबंधारे खाते, राजकीय नेते की वाळू माफिया…?

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

18 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago