मुख्य बातम्या

शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिसांनी आंतरराज्यीय सराईत चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ३.१५ किलो तांब्याच्या कॉईलसह एकुण ५लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.

घटना कशी उघडकीस आली…?

दि ४ जुलै २०२५ रोजी रात्री आंबळे (ता. शिरुर) येथील गट नं. ५७९ मधून १००/२२ के.व्ही. ट्रान्सफॉर्मर (डी.पी.) मधील सुमारे ५० किलो तांबे असलेली कॉईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय विद्युत कायदा कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तपासाची दिशा आणि पोलिसांचा सापळा…

तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुप्त माहिती संकलन, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टोळीचा शोध घेतला गेला. गुप्त माहितीच्या आधारे चिखली, पुणे येथे सापळा रचून मारुती सुझुकी एसएक्स ४ (एम एच ०१ए एच ३९१२) या वाहनासह तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

यातील तीन आरोपी १) लवकुश कुमार गौतम (वय २२) मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, २) मोहम्मद फरान खान (वय २१) मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, ३) मुजाहिर सौकत अली खान (वय २२) मूळ रा. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश (सर्व सध्या रा. कुदळवाडी, चिखली, पुणे) या आरोपींनी राहुल गुप्ता व लवकुश मिश्रा (पूर्ण पत्ता अज्ञात) यांच्यासह मिळून एकूण ९ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात ३१५ किलो तांबे (कॉईल) अंदाजे किंमत २ लाख ५० हजार, चोरीत वापरलेली एसएक्स ४ कार, अंदाजे किंमत ३ लाख असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, अरुण उबाळे, शरद वारे, विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांनी केली आहे.

शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड

शिक्रापूर पोलिसांनी चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन चोरांना रंगेहाथ पकडले

शिरुर तालुक्यात बेकायदेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी सापडले; चार जणांना अटक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

इम्यूनिटी बुस्ट करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींपासून तयार करा काढा

पावसाळ्यात पावसामुळे निसर्ग मस्त हिरवेगार बनते, त्यासोबतच उन्हाळ्यानंतर आपल्याला मानसिक शांतीही मिळते. पण त्याचबरोबर पावसाळ्यात…

2 तास ago

रोज रात्री पायाला तेलानं मालिश करा, तब्येत कायमची सुधरवून टाकणारा पाहा सोपा उपाय

तब्येत सांभाळण्यासाठी लोकांना पुरेसा वेळ मिळत नाही. पण अनेकांना हे माहीत नसतं की, आयुर्वेदात अशा…

2 तास ago

लहान मुलांसह त्यांच्या आईबाबांचाही ब्रेन रॉट नावाचा आजार कसा ओळखाल

खूप मोबाईल किंवा टीव्ही पाहतात म्हणून फक्त लहान मुलांनाच दोष देऊन उपयोग नाही. कारण त्यांच्या…

2 तास ago

४० कोटींच्या कथित कर्ज घोटाळा प्रकरणात अरविंद पाटील निलंगेकरांना दिलासा नाही

दोषमुक्तीचा अर्ज उच्च न्यायालयाकडून फेटाळला नाशिक: युनियन बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या…

2 तास ago

शिक्षकांच्या प्रश्नांना सरकारचे प्राधान्य; सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदेंचे आवाहन

अमरावती: शिक्षकांच्या प्रश्नांना सरकार प्राधान्य देईल आणि महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी वचननाम्यात दिलेली आश्वासने…

2 तास ago

संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे संघर्ष करावा; विजय वडेट्टीवार

अमरावती: देशातील लोकशाही व्यवस्था, भारतीय संविधान आणि बहुजन समाजाचे अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी निर्भीडपणे…

2 तास ago