शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोकोका) गुन्हा दाखल असलेल्या आणि गेल्या सात महिन्यांपासुन फरार असलेल्या टोळीप्रमुख योगेश केशव मचाले (रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि. पुणे) याला शिरुर पोलिसांच्या तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून वाघोली (ता.हवेली) येथील खांदवेनगर परिसरातून ताब्यात घेतले.
दि १९ मार्च २०२६ रोजी मांडवगण फराटा येथील भैरवनाथ क्रिकेट मैदानावर क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवर सूत्रधार शिंदे याचा फोटो न लावल्याच्या कारणावरुन वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले (वय ३१, रा. मांडवगण फराटा) यांच्याशी काही जणांनी वाद घातला. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा, तसेच दगडफेक आणि शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले करीत आहेत.
पोलिसांना पाहताच आरोपीचा पळण्याचा प्रयत्न…
टोळीप्रमुख योगेश मचाले हा खांदवेनगर, वाघोली येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार विनोद मोरे आणि पोलीस अंमलदार सुशिल सुरवसे यांना मिळाली. शिरुरचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना झाले. पोलिसांना पाहताच मचालेने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पाठलाग करुन त्याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले. मचाले याच्यावर खंडणी, मारहाण आणि खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार विनोद मोरे, राहुल भवर, शरद वारे, अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार सुशिल सुरवसे, निखील रावडे, दादाराव नागरे, नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, सचिन भोई, अंबादास थोरे, अजय पाटील, रविंद्र काळे आणि वैभव शेलार यांच्या पथकाने केली.
जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या…
आपल्या एकंदर आरोग्याचा, सुदृढतेचा आपल्या दातांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. दात चांगले असतील तर पचनसंस्थाही…
ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके पेय मानले जाते. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर…
‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतून मजुरांना काम; एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत – महसूल मंत्री चंद्रशेखर…
मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय…
मुंबई : न्यायालयाच्या दारात गोळीबार होणे हे राज्यातील अराजकतेचे लक्षण आहे. गुन्हेगारांना कायद्याचे किंवा पोलिसांचे…