शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एक मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल ३५ गहाळ मोबाईल फोन शोधून काढत ते त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. ही सर्व मोबाईल्स परराज्य व परजिल्ह्यांमधून शोधून काढण्यात आली असून त्यांची एकूण अंदाजे किंमत सुमारे ६ लाख ८६ हजार रुपये इतकी आहे.
सन २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान शिरूर शहरातील बाजारपेठ, बस स्थानक आणि इतर परिसरातून मोबाईल हरवलेबाबत अनेक तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या. या तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मा. श्री. संदेश केंजळे यांनी विशेष तपास पथकाला मोबाईल शोधण्याचे आदेश दिले.त्यानुसार, पोलीस कॉन्स्टेबल विजय गजानन शिंदे यांनी सुसज्ज तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत हरवलेले मोबाईल ट्रॅक करण्याचे काम सुरू केले. या परिश्रमातून तब्बल ३५ मोबाईल्स यशस्वीरीत्या शोधण्यात आले.
दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी, पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या हस्ते हे मोबाईल फोन मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. अनेक नागरिकांनी गहाळ मोबाईल परत मिळणार नाही असे मानले होते, मात्र पुन्हा आपला मोबाईल परत मिळाल्याने त्यांनी शिरूर पोलीस स्टेशनच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आणि मनापासून आभार व्यक्त केले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, तसेच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अमंलदार विजय शिंदे यांचा मोलाचा सहभाग होता.शिरूर पोलिसांची ही कामगिरी नागरिकांमध्ये विश्वास वाढवणारी ठरली असून, पोलिसांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन अधिक बळकट करणारी आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…