शिंदोडी (तेजस फडके) गेल्या अनेक वर्षांपासुन शिरुर येथील तहसिलदार कार्यालयातील महसुल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत. काही वर्षांपुर्वी तहसिल कार्यालयात बोकडाचा नैवेद्य दाखविण्यात आला होता. त्यानंतर आता वाळू माफियांनी महसुलच्या अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी चिंचणी येथील वाळू डेपोच्या ठिकाणी नऊ बकऱ्यांची कंदुरी आणि दारुची पार्टी दिली असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली असुन या पार्टीत शिरुरच्या महसूल अधिकाऱ्यांसह पुण्याच्याही महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दारुच्या नशेत झिंगाट डान्स केल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा सुरु आहे.
शिरुर तालुका आणि बेकायदेशीर वाळू उपसा हे गेल्या अनेक वर्षांपासुनच समीकरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन शिरुर तालुक्यात बेसुमार बेकायदेशीर वाळू उपसा चालु असुन वाळू माफिया आणि महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे लागेबांधे आहेत. त्यामुळे गेल्या 10 ते 15 वर्षांपासुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवला जात असतानाही महसूलचे अधिकारी आणि कर्मचारी ‘अपना काम बनता तो भाड मे जाये जनता’ या म्हणीप्रमाणे फक्त ‘अपना सपना मनी मनी’ म्हणतं वाळू उपशाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत.
गेल्या वर्षेभर चिंचणी येथे वाळू डेपोच्या नावाखाली वाळू माफियांनी शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून लाखो ब्रास वाळूची चोरी केली आहे. परंतु महसूल विभाग कायमच त्यांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे त्यांच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी वाळू माफियांनी नुकत्याच एका मटण पार्टीचं आयोजन केलं होत. त्यात पुण्यातील काही महसूलचे अधिकारी आणि शिरुर तहसिलदार कार्यालयातील महसूल विभागाचे काही अधिकारी कर्मचारी सामील झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
या पार्टीत नऊ बकऱ्यांचा बळी देत अधिकाऱ्यांना ‘कंदुरी’ चारण्यात आली. तसेच दारुच्या नशेत तर्रर्रर्र झालेल्या महसूलच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वाळू माफियांसोबत झिंगाट डान्स केल्याचीही चिंचणी आणि गुनाट परीसरात दबक्या आवाजात जोरदार चर्चा चालु आहे. त्यामुळे बोकडाच्या नैवेद्यानंतर शिरुर तहसिल कार्यालयातील महसूल विभागाचा अजुन एक नवीन कारनामा समोर आला आहे.
शिरुरमधील युवकाच्या आत्महत्येचे कारण आले समोर; प्रेमसंबंधातून मारहाण अन् गळफास
रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार
शिरुर; चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याने कारचालकास एक वर्षाचा कारावास
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…