मुख्य बातम्या

शिरुरमधील ‘त्या’ युवकाच्या आत्महत्येचे कारण आले समोर; प्रेमसंबंधातून मारहाण अन् गळफास…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील विशाल नवनाथ शिंदे (वय 21) रा. बाबुरावनगर शिरुर, मुळ (रा. विसापुर ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) या युवकाला एका महीलेच्या नवऱ्याने प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन मित्रांच्या मदतीने मारहाण करुन दमदाटी केल्याने त्याच नैराश्यातुन विशाल शिंदे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन जणांसह इतर २ ते ३ अनोळखी इसमांविरुध्द शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे (दि २५) मार्च रोजी दुपारी १:३० ते २:०० वाजण्याच्या दरम्यान विशाल नवनाथ शिंदे याचे शिरुर येथील एका नर्स सोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरुन तिचा पती अंकुश भालचंद्र भवरे हा त्याच्यासोबत अक्षय लाला मदने, अनिकेत लक्ष्मण घोंगडे तसेच इतर 2 ते 3 अनोळखी साथीदारांना सोबत घेऊन मयत विशाल नवनाथ शिंदे याला तो काम करत असलेल्या चिंतामणी लॅब बोरा हॉस्पीटलजवळ शिरुर, येथुन शनिमंदिराजवळ, लाटे आळी, शिरुर येथे घेऊन गेला. त्यानंतर विशाल याला वरील सर्वांनी मारहाण दमदाटी केली.

 

त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून विशाल शिंदे याने त्याच्या कृष्णई विहार, बाबुराव नगर शिरुर येथील राहत्या घरामध्ये किचन रुममधील सिलींगला असलेल्या लोखंडी हुकला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे . याबाबत शिरुर पोलिस स्टेशनमध्ये महीलेचा पती १) अंकुश भालचंद्र भवरे व त्याचे साथीदार २) अक्षय लाला मदने, ३) अनिकेत लक्ष्मण घोंगडे व इतर २ ते ३ अनोळखींविरुध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहेत.

रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

शिरूर तालुक्यात एका मित्राचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याने घेतला गळफास…

शिरुर; चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याने कारचालकास एक वर्षाचा कारावास

शिरुर; वाळू माफियांकडुन महसुलच्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांना नऊ बकऱ्यांची कंदुरी, पार्टीत दारु पिऊन अधिकारी झिंगाट

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

8 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago