मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात बापानेच केला मुलीचा खून…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून एक सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी रात्रभर बालिकेचा शोध घेतला. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे आज्ञातावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर बालिकेचा तिच्या वडिलांनीच खून केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील बजरंगवाडी येथून अपेक्षा युवराज सोळुंके (वय ७) ही चिमुकली मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. शिक्रापूर पोलिसांनी अनेक ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, मुलगी मिळाली नव्हती. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याबाबत मुलीच्या आईने फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेचा तपास पोलिस करत असताना अनेक ठिकाणी सीसीटिव्ही तपासले. मुलीच्या वडिलांनी मुलीला नदीच्या कडेला नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यानेच मुलीचा वेळ नदीच्या पाण्यात ढकलून खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ नदीपात्रात धाव घेतली. घटनास्थळी मुलीच्या चपला मिळून आल्या. मात्र, मुलीचा मृतदेह सायंकाळी उशिरापर्यंत मिळून आलेला नाही. शिक्रापूर पोलिसांनी मुलीचे वडील युवराज सोळुंके यास ताब्यात घेतले आहे. याबाबतचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

13 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago