शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरी गंगावणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. शिरूर शहरातील वर्दळीच्या परिसरात सकाळच्या वेळी गोळीबार झाल्याने शिरूर शहर हादरले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
View this post on Instagram
गोळीबाराची माहिती मिळताच शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलिस पथकासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. दरम्यान, पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळाची पाहणी सुरू आहे.
View this post on Instagram
गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, हरी गंगावणे यांच्यावर गोळीबार कोणी केला, आरोपी किती होते आणि त्यांच्यात पूर्वीपासून काही वाद होता का, याबाबत पोलिस तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी महत्त्वाचे पुरावे मिळविण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शिरूर शहरात वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके कामाला लागल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. आजच्या घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याबरोबरच गोळीबारामागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे का, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा काही संबंध आहे का किंवा अन्य कोणते कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
View this post on Instagram
शिरूर परिसरात गोळीबाराच्या घटनांची मालिका…
दरम्यान, शिरूर शहर आणि परिसरात गेल्या काही काळात गोळीबाराच्या घटना घडल्याने या घटनेने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. १ जून २०२६ रोजी करडे घाट परिसरात गोळीबार झाला होता. शिरूर-चौफुला मार्गावरील करडे घाट परिसरात जुन्या वादातून दोन गटांमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत विशाल सुनील काळे या सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता, तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA/मोक्का) अंतर्गत कारवाई केली होती. त्यानंतर १८ जुलै २०२६ रोजी करडे गाव परिसरातही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेचा तपशील आणि त्यावरील पोलिस कारवाईची अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर त्याचा तपशील या वृत्तात जोडता येईल.
शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…
शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…
शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…
शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…
शिरूर पोलिसांनी गोळीबार प्रकरणातील आरोपीला काही तासांतच परजिल्ह्यातून केले जेरबंद…