मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गर्भलिंग तपासणीसारख्या कायद्याने पूर्णपणे बंदी असलेल्या घृणास्पद प्रकाराला शिरुरमध्ये आता हायटेक रूप मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली) या दोघांवर कठोर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात शिरूर तालुक्यासह शिरुर शहरातील काही नामांकित डॉक्टरांचाही सहभाग असल्याची चर्चा रंगली आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटने गर्भलिंग तपासणीसाठी अत्यंत सुसूत्र आणि गुप्त यंत्रणा उभी केली होती. थेट दवाखान्यात येण्याऐवजी गर्भवती महिलांशी संपर्क साधण्यासाठी विशेष मोबाईल ॲपचा वापर केला जात होता. ॲपवरुन संपर्क साधल्यानंतर काही मध्यस्थ गर्भवती महिलांना संपर्क करत आणि त्यांना गुप्त ठिकाणी नेऊन अल्ट्रासोनोग्राफी करुन गर्भाचे लिंग सांगितले जात असल्याचा आरोप आहे. या संपूर्ण व्यवहारात पुरावे नष्ट करण्यासाठी डिजिटल पद्धती, कोडवर्ड आणि रोख व्यवहार यांचा वापर केल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे बराच काळ हा काळा धंदा प्रशासनाच्या नजरेतून सुटत राहिल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या रॅकेटमध्ये स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या काही डॉक्टरांची नावे पुढे येत असल्याची दबक्या आवाजात सगळीकडे चर्चा असून त्यामुळे या डॉक्टरांचेही धाबे दणाणले आहेत. शिरुर तालुक्यात गर्भलिंग तपासणीला प्रतिबंध करणाऱ्या कायद्याचे उघड उल्लंघन होत असताना इतका मोठा अवैध कारभार सुरु राहिल्यामुळे आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त करत “मुलगी वाचवा”चा नारा देणाऱ्या समाजातच गर्भलिंग तपासणीचा काळाबाजार चालत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत असून लवकरच या रॅकेटमधील डॉक्टर, मध्यस्थ आणि इतर संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिरूरमध्ये उघड झालेल्या या हायटेक गर्भलिंग तपासणी रॅकेटमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आता प्रशासन या प्रकरणात नेमकी किती मोठी कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिरुर शहरातील काही नामांकित हॉस्पिटलचे डॉक्टरही या गैरप्रकारात सामील असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. शिरुर तालुक्यातील काही डॉक्टरांचाही या गैरप्रकारात सहभाग असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा असून आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

काय आहे कायदा…?
गर्भलिंग तपासणी रोखण्यासाठी केंद्र सरकारने PCPNDT कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार गर्भातील बाळाचे लिंग सांगणे किंवा त्यासाठी तपासणी करणे हा गंभीर गुन्हा आहे. दोषी आढळल्यास डॉक्टरांचा परवाना रद्द होऊन कारावास आणि दंडाची तरतूद आहे.

कसे चालत होते रॅकेट…?
मोबाईल ॲपच्या माध्यमातून संपर्क
मध्यस्थांमार्फत गर्भवती महिलांना गुप्त ठिकाणी नेणे आणि त्यांची अल्ट्रासोनोग्राफी करुन गर्भलिंग सांगणे. तसेच व्यवहार रोख किंवा डिजिटल पद्धतीने चालत होता. आणि पुरावे लपवण्यासाठी कोडवर्डचा वापरही केला जात असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
(क्रमश:)

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

गर्भाशयातील गाठी काढण्याच्या नावाखाली गर्भाशयच काढले; पुण्यात त्या हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा; डॉ. नीलम गोऱ्हे

शिरूर! सुलभ भिशीच्या नावाखाली पोलीस व नागरिकांना तब्बल ३० कोटींचा गंडा?

शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

2 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

5 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

5 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

5 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

20 तास ago

सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी जनजागृतीच प्रभावी ‘फायरवॉल’!

आशिष शेलार यांच्या हस्ते ‘बी सायबर स्ट्रीट स्मार्ट’ मोहिमेचा शुभारंभ; एआय फसवणूक, डीपफेक, डिजिटल अटकसह…

2 दिवस ago