मुख्य बातम्या

शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणात राजरोजपणे दिवसाढवळ्या बेकायदेशीर अवैध वाळू उपसा सुरुच आहे. शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाने सहा वेळा संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी फोडल्या. मात्र, या सर्व कारवायांनंतरही एकाही वाळू माफियावर गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिरुर तसेच श्रीगोंदा तालुक्यातील स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळेच महसूल विभागाने कारवाई अर्धवट ठेवत वाळू माफियांना मोकळे रान दिल्याची सध्या सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे. घोड धरणाच्या परिसरात सध्या दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणावर यांत्रिक बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु असल्याचे चित्र आहे. स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी याबाबत अनेकदा तक्रारी करुनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

महसूल विभागाने आतापर्यंत सहा वेळा धाड टाकून वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी फोडल्या, मात्र त्या बोटी कोणाच्या होत्या, त्यामागे कोणता वाळू माफिया आहे याचा तपास करण्याची तसदी घेतली गेली नाही. उलट कारवाई केवळ दिखाव्यासाठी केली जात असल्याचीही टीका स्थानिकांकडून होत आहे. विशेष म्हणजे, बोटी फोडल्याची कारवाई केल्यानंतर काही दिवसांतच त्याच बोटी दुरुस्त करुन पुन्हा वाळू उपसा सुरु केला जातो. त्यामुळे ही कारवाई केवळ “नाटक” असल्याचा आरोपही नागरिक करत आहेत.

घोड धरणातून अवैधरित्या काढली जाणारी वाळू डंपरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पाठवली जात असून, यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे. महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्या डोळ्यांदेखत हा सगळा प्रकार सुरु असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. काही राजकीय नेत्यांच्या छत्रछायेखाली हे वाळू माफिया बिनधास्तपणे धंदा करत आहेत. त्यामुळे महसूल विभाग कारवाई करण्यास धजावत नाही आणि गुन्हे दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जाते असा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे.

दरम्यान, घोड धरणातील अशा प्रकारच्या अनियंत्रित वाळू उपशामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असून धरणाच्या संरचनेवरही परिणाम होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, महसूल विभाग बोटी फोडण्यापुरतीच कारवाई करत राहणार का…? की खऱ्या अर्थाने वाळू माफियांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार…? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

घोड धरणात वाळू माफियांचा धुमाकूळ; महसूल आणि पोलिस प्रशासन हतबल…?

शिरुर तालुक्यात वाळू उपशावरुन दोन गट आमनेसामने; फायटर व दगडांनी हल्ला…

ZP निवडणूक काळात घोड धरणात वाळू माफिया सक्रिय अन प्रशासन मात्र निष्क्रिय…?

Video: ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या बातमीचा दणका; महसुल विभागाने वाळूच्या बोटी फोडल्या…

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

Video; घोड धरणात वाळू उपसा करणारी यांत्रिक बोट पुन्हा उध्वस्त, तरीही वाळू उपसा सुरुच

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

1 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

3 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

5 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

17 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

18 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

18 तास ago