Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे): करडे (ता. शिरूर) येथील श्रीकांत साहु याने मागील दोन महिन्यापासून करडे येथील एका महिलेकडे वाईट नजरेने पाहून मोठ मोठ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. महिलेसोबत लज्जास्पद वर्तन केल्याने त्याच्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ सप्टेबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते मागील २ महिन्यांपासून वेळोवळी करडे येथील महिलेच्या घरासमोर श्रीकांत साहु (रा. करडे) याने वेळोवळी महिलेचा विनयभंग करण्याचा उददेशाने त्याच्या घराच्या गॅलरीमध्ये अर्धवट कपड्यांमध्ये वावरून फोनवर मोठ मोठ्याने शिवीगाळ करून जाता येता सतत महिलेकडे वाईट नजरेने पाहिले. १७ सप्टेबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घराच्या समोर असताना श्रीकांत साहु हा घरासमोरील गॅलरीमधुन त्यांच्याकडे वाईट नजरेने पाहुन मोठ मोठ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. महिलेला लाजलेसारखे झाले म्हणून त्यांनी त्यास तु मला शिवीगाळ का करतो? असे म्हणाले असता, त्याने मी कंपनीचा मॅनेजर आहे. मी तुमच्यावर कोणतीही तक्रार करील, असे म्हणून महिलेस दमदाटी करून धमकी दिली आहे.
दरम्यान, महिलेने शिरूर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जाधव हे करत आहेत.
शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू
शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून…
शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली….
शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी…
शिक्रापूरमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय; ५ ताब्यात…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…