शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात वाळू माफियांचा आणखीन एक कारनामा समोर आला असुन शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी चिंचणी (ता. शिरुर) येथे बेकायदेशीर वाळूच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच. तहसीलदार पाठलाग करत असलेल्या रस्त्यावर वाळूचा हायवा खाली करुन पळ काढला आहे. त्यामुळे तहसीलदारांना वाळूच्या गाडीवर कारवाई करता आली नाही. त्यामुळे या मस्तवाल वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या दोन महिन्यापासुन कोणताही लिलाव झालेला नसताना रात्रीच्या वेळेस सुमारे ८ ते १० यांत्रिक बोटींच्या साह्याने बेकायदेशीर वाळू उपसा सुरु असुन याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने आवाज उठवला आहे. परंतु बेकायदेशीर वाळू उपशातुन मिळणाऱ्या पैशामुळे हे वाळू माफिया मस्तवाल झाले आहेत. त्यामुळे सध्या ते महसूल विभाग आणि पोलिसांनाही जुमनात नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
पण काळ सोकावला नाही पाहिजे….
सध्या घोड धरणात रात्रीच्या वेळेस बेकायदेशीररीत्या बेसुमार वाळू उपसा चालु असुन शिरुर तालुक्यातील चिंचणी, गुनाट, कुऱ्हाडवाडी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, दाणेवाडी या गावातील वाळू माफिया मोठया प्रमाणात घोड धरणातुन वाळू उपसा करत असुन महसूल व पोलिस प्रशासनाला वाळू माफिया अजिबात जुमानात नाहीत. त्यामुळे ‘म्हातारी मेल्याच दुःख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे’ या म्हणीप्रमाणे महसूल विभाग आणि पोलिसांनी या वाळू माफियांवर संयुक्त कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत सर्वसामान्य लोक व्यक्त करत आहेत.
शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून
शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग
घोड धरणातील वाळू चोरीबाबत महसुल विभागाच वरातीमागुन घोड शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल