क्राईम

शिरूरमध्ये तुला लय माज आला आहे काय? असे म्हणाला अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर शहरातील गल्लीमध्ये चालताना धक्का लागल्याने एकाला धारदार हत्याराने जखमी करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर येथील भाजी मार्केटच्या गल्लीमध्ये चालताना गणेश गावडे याचा रमजान उर्फ टिपू आजम पटेल याला धक्का लागल्याने पटेल याने गावडे याला नीट चल असे म्हणाला. यावेळी दोघात भांडण झाले. पण, उपस्थित नागरिकांनी त्यांचे भांडण सोडवले. त्यानंतर गावडे याने पटेल हा भाजी मार्केटमध्ये बसलेला असताना धारदार हत्यार आणून पटेल याच्या डोक्यात हत्यार मारून जखमी करून शिवीगाळ दमदाटी केली आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, १७ सप्टेबर रोजी ९ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान शिरूर येथील भाजीमार्केट गल्लीमध्ये चालताना गणेश गावडे याचा रमजान उर्फ टिपू आजम पटेल याला धक्का लागल्याने पटेल त्याला निट चाल म्हणाल्याचा राग आल्याने त्याने पटेलला शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांची भांडणे तेथे जमलेल्या लोकांनी सोडवली. त्यानंतर भाजीमार्केट गल्लीमध्ये रमजान उर्फ टिपू आजम पटेल हा बसलेला असताना आरोपी गणेश गावडे हा त्या ठिकाणी आला व म्हणाला, ‘तुला लय माज आला आहे काय?’ असे म्हणून त्याने त्याचे जवळील कोणते तरी धारदार हत्यार रमजान उर्फ टिपू आजम पटेल याच्या डोक्यात मारून जखमी करून शिवीगाळ दमदाटी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत गिरी हे करत आहेत.

शिरूर तालुक्यात कंपनीच्या मॅनेजरने केला महिलेचा विनयभंग…

शिरुर; वाळु माफियांचा आणखीन एक कारनामा; तहसीलदार पाठीमागे लागताच रस्त्यावरच टाकली वाळू

शिरूर तालुक्यातील गावावाल्याने रचला कट; अपहरण, महिलेसोबत फोटो काढून…

शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी…

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली….

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

5 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago