शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी…

क्राईम शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालविणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या ब्युटीपार्लर मध्ये प्रवेश करत ‘तुझ्यामुळे आमच्या घरात भांडण होत आहेत’ असे म्हणत सदर महिलेला अश्लील तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करुन ब्युटी पार्लर जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या सतिश शिंदे या व्यक्तीच्या विरोधात शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १२ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सदर महिला ब्युटीपार्लरमध्ये काम करत असताना सतिश शिंदे हा दारुचे नशेत तेथे आला. त्याने ब्युटी पार्लरचा दरवाजा जोरात वाजवला असता फिर्यादी दरवाजा उघडुन बाहेर आल्या. त्यानंतर सतीश शिंदे याने या महिलेला ‘तुझ्यामुळे आमच्या घरी भांडणे होत आहेत’ असे म्हणत जोरजोराने अश्लील व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन टाँपची काँलर पकडुन हाताने पाठीवर व कानाखाली चापट मारुन तुझे पार्लर जाळुन टाकतो. तसेच तु या ठिकाणी कसा व्यवसाय करते ते पाहतो असे म्हणुन दमदाटी केली आहे.

 

सदर महिलेने याबाबत शिरुर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेडकर हे करत आहेत.

शिरुर तालुक्यातील महसुल विभाग आपल्याच कामात गुंग अन वाळु माफिया मात्र वाळु चोरण्यात दंग

शिरुर तालुक्यात अल्पवयीन मुली पळुन जाण्याच्या प्रमाणात वाढ; पालकांची चिंता वाढली

शिरुर; आनंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या रकमेचा अपहार करणाऱ्यांची आरोपींची दुचाकी, चारचाकी वाहने जप्त