मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू; मात्र अधिकारी म्हणतात…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरुर तालुक्यातील दहिवडी गावच्या मांजरेवस्ती शिवारात शुक्रवारी (ता. २१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वन्य प्राण्याच्या हल्ल्यात यश शरद गायकवाड (वय १०) मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. परंतु, हा हल्ला बिबट्यानेचं केलाय की अन्य वन्यप्राण्याने केलाय याबाबत खात्रीलायक माहिती उपलब्ध झालेली नाही. यश गायकवाड याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यश हा शुक्रवार (दि २१) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील बाजूस शौचास गेला असता. तिथेच गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला व उसाच्या शेतात ओढत घेऊन गेला. बराच वेळ झाला तरी शौचास गेलेला मुलगा येईना म्हणून घराच्या पुढील बाजूस शेतात काम करणाऱ्या यशच्या कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली. बराच वेळ शोध घेतल्या नंतर तेथील उसामध्ये पाहिले असता विचित्र अवस्थेत यश चा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेनंतर दहिवडी परिसरात ग्रामस्थांचा मोठा उद्रेक झाला आहे. बिबट्याचे हल्ले थांबविण्यासाठी वनविभाग तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करत आहेत. तीन चार दिवसांपूर्वीच पारोडी, इंगळेनगर येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली. या परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. वेळोवेळी वन विभागाला याबाबत माहिती देण्यात आलेली होती. तरीही वनविभागाने कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. यास वनविभाग जबाबदार आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रथम दर्शनी हा बिबट्याचा हल्ला वाटत नाही. आम्ही ससून रुग्णालयात शवविच्छेदन केलेले आहे. त्याचा अहवाल येण्यासाठी आठ ते दहा दिवस लागतील. त्यामुळे तूर्तास तरी हा बिबट्याचा हल्ला आहे किंवा अन्य कोणत्या वन्यप्राण्याचा हल्ला आहे हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच समजेल.
– प्रताप जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी, शिरुर

दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी दहिवडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी वनविभागाला केली होती. याआधी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे खुप वेळा दिसले होते. वनविभागाने बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण रोखण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे.
– जालिंदर पवार, पोलीस पाटील, दहिवडी

शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळीदेखील शेतात जावे लागते. यावर उपाय करणे गरजेचे. बिबट्याच्या भीतीमुळे ग्रामस्थ भयभीत झालेले आहेत. बिबट्याची दहशत अजून किती दिवस सहन करावी लागणार.
– स्थानिक शेतकरी

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

शिरुरच्या बेट भागातील तामखरवाडी येथे बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, सुदैवाने दोघेही बचावले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

2 दिवस ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

3 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

3 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

3 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

3 दिवस ago