मुख्य बातम्या

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अडचणीत वाढ…

नागपूर : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमानना खटला चालवण्यात येणार आहे. या प्रकरणी नागपूर खंडपीठाने दिलीप वळसे पाटील यांना सहा आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाचे हे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र सहकार सोसायटी कायद्याच्या अंतर्गत याचिकातर्ता हरिभाऊ मोहोड यांनी सहकारिता विभागाकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर अनेक महिने सुनावणी न झाल्याने मोहोड यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. १९ जानेवारी २०२४ रोजी न्यायालयाने सुनावणीसाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चार आठवड्याचा कालावधी दिला होता. त्यानंतर ९ फेब्रुवारी २०२४ रोजी देखील न्यायालयाने अशाच प्रकारचा आदेश दिला.

न्यायालयाने दोन आदेश दिल्यानंतरही मोहोड यांच्या अपिलावर सुनावणी झाली नाही. यानंतर १९ जून रोजी सहकारमंत्री आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यावर अवमान खटला दाखल केला आहे. याप्रकरणी सहा आठवड्यांच्या कालावधीत न्यायालयात जबाब सादर करायचा आहे.

हरिभाऊ मोहोड यांनी दाखल केलेल्या अपीलावर अनेक महिने सुनावणी न झाल्याने शेवटी उच्च न्यायालयात धाव घेतली. सरकारकडून उच्च न्यायालयात चार आठवड्यात सुनावणी केली जाईल, अशी माहिती दिली गेली होती. तेव्हा उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना चार आठवड्याचा कालावधी दिला होता. पण या आदेशानंतरही सुनावणी न झाल्याने शेवटी सहकारमंत्री आणि विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यावर अवमान खटला दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणी दोघांनाही नोटीस बजावली आहे.

दिलीप वळसे पाटील यांना भरसभेत अश्रू अनावर…

दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर तर…

पुर्वा वळसे पाटील यांचा बनावट अकाउंटबाबत सोशल मीडियावरून खुलासा…

खासदार डॉ अमोल कोल्हे यांना पुर्वा वळसे पाटील यांच्याकडुन विजयाच्या शुभेच्छा अन चर्चांना उधाण…

मोठी बातमी! शरद पवार यांचा दिलीप वळसे पाटील यांना मोठा धक्का…

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

ग्रामपंचायत निवडणूक! दिलीप वळसे पाटील यांना स्वतःच्या गावातच धक्का…

दिलीप वळसे पाटील यांची शरद पवार यांच्यावर जोरदार टीका अन् स्पष्टीकरण…

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

10 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

10 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

10 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago