leopard-koregaon-bhima

कोरेगाव भीमा येथील फरशी ओढ्याजवळ बिबट्याने पळवला बोकड…

शिरूर तालुका

कोरेगाव भीमाः कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे फरशी ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांच्या गोठ्यावरील पूर्ण वाढ झालेल्या बोकडला सायंकाळी साडेसहा सातच्या सुमारास बिबट्याने झडप घालत उचलून नेत शिकार केल्याने कोरेगाव भीमा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरेगाव भीमा येथील फरची ओढ्याजवळ पद्माकर देवराम ढेरंगे यांचा गायांचा गोठा आहे. शेती कामासाठी एक महिन्यापूर्वी मराठवाड्यातील एक कुटुंब कामास आले असून, चंद्रकला चाफेकानडे यांच्या मालकीचा पूर्ण वाढ झालेला देशी बोकड बिबट्याने सायंकाळच्या सुमारास झडप घालत ओढून नेल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

सदर घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हेमंत ढेरंगे यांनी कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे यांना दिली. यावेळी नागरिक यांनी शिरूर तालुक्याचे तालुका वनाधिकारी जगताप व वणपाल धातुंदे यांच्याशी समरक साधला. तसेच सरपंच संदीप ढेरंगे यांनी वनविभगाशी तातडीने संपर्क साधला असता वनपाल धातुंडे यांनी तातडीने सदर घटना स्थळास भेट देत पाहणी करत पंचनामा केला.

सदर घटना घडून गेल्यावर अर्ध्या तासाताच वनविभागाचे कर्मचारी वनपाल धातुंडे आल्याने सरपंच व उपस्थित नागरिकांनी त्यांचे आभार मानले. वनपाल धातुंडे यांनी सदर घटनस्थळाचा पंचनामा केला असून, याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरंगे, उद्योजक हेमंत ढेरंगे, पद्माकर ढेरंगे, चंद्रकला चाफेकानडे व वनपाल धातुंडे उपस्थित होते.

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली

शिरूर तालुक्यात बिबट्या आणि शेतकऱ्यामध्ये झाली झटापट…

Video: इंदोरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या अन्…

बापरे! शिरूर तालुक्यात बिबट्याची थेट शाळेच्या क्रीडांगणावरच एन्ट्री…

शिरूर तालुक्यात शेतीला पाणी देताना युवकावर केला बिबट्याने हल्ला…