पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा महत्त्वाचा संपर्क रस्ता सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
या मार्गावरून दररोज शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असते. मात्र सर्वत्र पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत असून वाहनांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.
पावसाळ्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली असून खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे.
याची तातडीने दखल घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने पाबळ–कन्हेरसर रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी आणि खड्डे बुजवावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…