मुख्य बातम्या

शिरूर तहसील कार्यालयातील अधिकारी लाच घेताना पकडला…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तहसील कार्यालय येथे पाच हजाराची लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे, अशी माहिती पुणे लाच लुचपत विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिली. नितेशकुमार धोंडीबाराव धर्मापुरीकर (पद महसुल सहायक, शिरूर तहसील कार्यालय) यांना पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा अधिकारी यापुर्वी इंदापुर येथे असताना तेथेही लाचलुचपत विभागाने त्याच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा शिरूर येथे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती पुढील प्रमाणे, एक २८ वर्षे पुरुष तक्रारदार यांचे गट नंबर १९ च्या सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी तक्रारदार यांनी तहसिलदार कार्यालयास अर्ज केला होता. सदरचा अर्ज लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांचेकडे प्रलंबित असून, तक्रारदार यांचे सात-बारा उता-यावरील इतर हक्कातील नावे कमी करण्यासाठी लोकसेवक नितेश धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे ५ हजार रुपये लाच मागणी केलेबाबतची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाकडे दिली होती.

सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक नितेशकुमार धर्मापुरीकर यांनी तक्रारदार यांचेकडे वरील कामासाठी ५ हजार रुपयाची लाच मागणी करुन, ती लाच रक्कम रुपये ५ हजार (पाच हजार) तक्रारदाराकडून पंचासमक्ष स्विकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचेविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करत आहेत.

सदरची कारवाई पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. लोकसेवक शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
१) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
२) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९३०९९७७०० ३) ई-मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in
४) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in
५) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in

शिरूरमध्ये लाच मागणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल…

शिरुर; शरद सहकारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यावर लाचलुचपत विभागाची कारवाई…

शिरुर पोलीस स्टेशनचा लाचखोर सहाय्यक फौजदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण; विवस्त्र करून मारहाण; पाहा संबंधित Video…

लोकशाही च्या चौथ्या स्तंभाबाबत आदर राखायलाच हवा…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

3 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

10 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

10 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

11 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

11 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

11 तास ago