शिरुर पोलीस स्टेशनचा लाचखोर सहाय्यक फौजदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर पोलिस स्टेशनमधील सहाय्यक फौजदार राजेंद्र दगडू गवारे यांना १० हजाराची लाच घेताना लाललुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गवारे यांच्यावर काही दिवसांपुर्वी हृदयाची शस्त्रक्रिया झाली झाली होती. दिर्घ सुट्टीनंतर ते हजर झाले होते. मागील दोन वर्षापुर्वीच्या दाखल गुन्ह्यातील तपास करत असताना त्यांना पैसे कमविण्याचा मोह आवरला नाही.

 

त्यांनी तक्रारदाराकडे ५० हजारांची लाच मागणी करत तडजोडी अंती 10 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना राजेंद्र गवारे याला पुणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे लाचलुचपत विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार एका 65 वर्षीय पुरुष तक्रारदार आणि त्यांचा मुलगा यांच्या विरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सदर गुन्ह्यांमध्ये अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागणी गवारे करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांना प्राप्त झाली होती.

 

सदर तक्रारीच्या अनुषंगाने आज बुधवार (दि 20) रोजी पडताळणी दरम्यान तक्रारदाराने तडजोडी अंती दहा हजार रुपये गवारे याला देताना लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारताना पुणे येथील लाच लुचपत विभागाने यांनी रंगे हाथ पकडले. सदरची कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शितल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणिता सांगोलकर, पोलीस शिपाई प्रवीण तावरे आशिष डावकर, चालक पोलीस हवालदार काकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने केली आहे.