मुख्य बातम्या

शिरूरमध्ये गणपतीच्या वर्गणीवरून दुकानात घुसून महिलेला मारहाण; विनयभंग…

शिरूर (अरुणकुमार मोटे): गणपती मंडळाच्या वर्गणीसाठी दादागीरीने दुकानात घुसून खंडणी वसूलप्रकरणी खंडणीसह, विनयभंग, हाणामारीचा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरूर शहरातील पाबळफाटा येथील गणपती मंडळासाठी वर्गणीची मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून चक्क कायदा हातात घेऊन एका दुकानदार महिलेला तिच्या दुकानात घुसून खंडणी, मारहाण व विनयभंग केला. भांडणे सोडवायला आलेल्या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने डोके फुटेपर्यंत मारहाण दुखापत करून इतरांनाही जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहरातील पाबळ फाटा येथे महागणपती इलेक्ट्रीक दुकान आहे. फिर्यादी महिला दुकान चालवुन कुटूंबाची उपजिविका करते. सदर महिला दुकानात असताना तिच्या दुकानात १) अतुल गव्हाणे, २) अजय प्रकाश गव्हाणे, ३) विकी जाधव, ४) कैलास पवार, ५) अविनाश मोरे, ६) अतुल गिरे, ७) शुभम गव्हाणे, ८) भाऊसाहेब जाधव व इतर ७ ते ८ लोक (पूर्ण नाव माहीत नाही) असे दुकाना समोर आले. व त्यांनी ‘या महिलेला “गणपतीचे वर्गणी दया” असे म्हणाल्याने महिलेने त्यांना १०१/- रू वर्गनी करा, असे म्हणाल्या. त्यातील अतुल गव्हाणे याने मला “तुम्हाला पाबळ फाटयावर धंदा कारायचा असेल तर ११०० रुपयांची वर्गणी करावी लागेन नाहीतर तुम्हाला पाबळ फाट्यावर धंदा करू देणार नाही “आम्हाला ११०० रूपये च वर्गणी पाहीजे. त्याचे खाली एक रुपया घेणार नाही, असे बोलून महिलेकडे खंडणी नाही दिली तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. शिवाय, शिवीगाळ दमदाटी करू लागले. महिलेने आम्ही एवढी वर्गनी देवू शकत नाही. माझी १०१ रुपये वर्गनी करा असे म्हणाले असता वरील सर्वजन जबरदस्तीने महिलेचे दुकानात घुसुन अंगावर धावून आले व विकी जाधव याने विनयभंग केला.

ranjangaon-mutadwar-darshan

शेजारील दुकाना समोर उभे असलेला महिलेचा भाऊ, भाचे महिलेला सोडविण्यासाठी मध्ये पडून त्यांना भांडण करू नका, असे म्हणून समजावू लागले. वरील सर्वांनी त्यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवाय, वेल्डींगचे दुकानातील पडलेला लोखंडी रॉड हातात घेवून डोक्यात मारला त्यानंतर तेथे अतुल गव्हाणे याची आई (नाव माहीत नाही) आली तिने फिर्यादीला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी झटापटीत फिर्यादिचे हातातील अतुल गव्हाणे याने 5 ग्रॅमची अंगठी जबरदस्तीने काढूने घेतली आहे. त्यानंतर शुध्द आल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशनला सदर प्रकरणी तक्रार देण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.

घडलेली ही घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय स्वरूपाची आहे. ज्यांच्यावर हल्ला झाला ती महिला एक व्यावसायिक असून अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. काही एक चुक नसतानाही, या वसुली बहाद्दरांना मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून काही समजण्याच्या आतच नागरीकांवर हल्ला होतो हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणी समाजघातकी कृत्य आहे, असे सामाजिक कार्यकर्ता निलेश वाळूंज यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago