ajit pawar

अजित पवार यांच्यावर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; शिरूरकरांना आठवणी पाठविण्याचे आवाहन…

मुख्य बातम्या राजकीय शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. शिरूर तालुक्यातही त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत असून, शिरूर तालुक्याशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या अनेक आठवणी पुन्हा उजाळल्या जात आहेत.

अजित पवार यांचे शिरूर तालुक्यावर विशेष प्रेम होते. विकासकामे, पायाभूत सुविधा, उद्योग, पाणीपुरवठा, शेती आणि विविध प्रशासकीय प्रश्नांबाबत त्यांनी वेळोवेळी सकारात्मक भूमिका घेतल्या होत्या. शिरूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक यांचा त्यांच्याशी विविध कामांनिमित्त थेट संपर्क आला होता. त्यांच्या कार्यपद्धतीतील वेग, निर्णयक्षमता आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे अनेकांवर त्यांची छाप पडली होती.

अजित दादांच्या कार्याचा आणि आठवणींचा दस्तऐवज जतन करण्यासाठी ईश्वरी प्रकाशन आणि www.shirurtaluka.com यांच्या वतीने अजित पवार यांच्यावर एक विशेष स्मरणग्रंथ प्रकाशित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या वैयक्तिक आठवणी, अनुभव, प्रसंग आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडले जाणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

या उपक्रमांतर्गत, अजित पवार यांच्यासोबतचे आपले अनुभव, त्यांच्या कामकाजाबाबतच्या आठवणी, मार्गदर्शनाचे प्रसंग किंवा प्रेरणादायी घटना आपल्या शब्दांत लिहून पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त झालेल्या लेखांवर संपादकीय विभागाकडून आवश्यक ते संपादन करून निवडक लेख पुस्तकामध्ये समाविष्ट केले जाणार आहेत.

स्मरणग्रंथ लवकरच प्रकाशित करण्याचा मानस असून, हा ग्रंथ शिरूर तालुक्याच्या दृष्टीने ऐतिहासिक दस्तऐवज ठरेल, असा विश्वास आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील नागरिक, कार्यकर्ते आणि अजित पवार यांच्याशी संपर्क आलेल्या सर्वांनी आपल्या आठवणी लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. अजित पवार यांच्या कार्याचा ठसा आणि शिरूर तालुक्याशी असलेले त्यांचे नाते या पुस्तकाच्या माध्यमातून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
संतोष धायबर: 98812 42616
तेजस फडके: 97661 17755
shirurtaluka@gmail.com

अजितदादा पवार विमान दुर्घटनेवर नवे संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला ‘हिप्नोटाइज पायलट’चा अँगल

काका-पुतण्याचं जिव्हाळ्याचं नातं; रोहित पवारांच्या ‘हेअर स्टाईल’वरून अजित पवारांचा मिश्किल टोला चर्चेत

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांचे महाराष्ट्रला भावनिक आवाहन; म्हणाले…

संजय गांधी ते अजित पवार! विमान अपघातांत संपणारी राजकीय कारकीर्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच शेवटच फोनवर कोणाशी बोलण झाल…

‘शिरूर-हवेलीचा लोकनेता चंदन सोंडेकर’ या विशेषांकाचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन!

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)