pune-nagar-highway

पुणे ते छ. संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर वेग; खराडी ते शिरूर…

महाराष्ट्र

पुणे: पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग प्रकल्पाला अखेर वेग आला आहे. या महामार्गासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे 2200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीनफिल्ड पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या या सहा पदरी महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

महामार्गाचा पहिला टप्पा खराडी जंक्शन ते शिरूर बायपास दरम्यान सुमारे 53.4 किमीचा एलिव्हेटेड सहा लेन मार्ग म्हणून विकसित केला जाणार आहे. दुसरा टप्पा शिरूर बायपास ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान सुमारे 192.5 किमी लांबीचा नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग असेल. शिरूर ते खराडी प्रकल्पासाठी वेल्सपण इंटरप्रायझेसला एल-वन बोलीदार म्हणून काम देण्यात आले असून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरूर-छत्रपती संभाजीनगर दरम्यान चार टोल नाके प्रस्तावित आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर दरम्यान विद्यमान रस्त्याच्या नूतनीकरणाचेही नियोजन करण्यात आले आहे. खेड–शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणारा हा मार्ग पुणे–नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल. या प्रकल्पामुळे पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, वाळूज, शेंद्रा एमआयडीसी तसेच बीड आणि जालना या औद्योगिक क्षेत्रांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यांतील अंतर कमी होऊन औद्योगिक मालवाहतूक सुलभ होईल व आर्थिक विकासाला चालना मिळेल.

भारतमाला फेज-2 अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून बीओटी तत्वावर उभारला जाणार आहे. केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चार वर्षांपूर्वी या महामार्गाची घोषणा केली होती. प्रारंभी प्रकल्प भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे होता. मात्र, अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे सोपविण्यात आली आहे. सध्या भूसंपादन प्रक्रिया संबंधित महसूल विभागामार्फत वेगाने सुरू आहे. हा महामार्ग हवेली, भोर, दौंड, शिरूर आणि पुरंदर या तालुक्यांतून जाणार असल्याने स्थानिक विकासालाही चालना मिळणार आहे.

पुणे-शिरूर महामार्ग खरंच होणार कोंडीमुक्त; तीन मजली उड्डाणपुलाचे काम मार्चपासून…

पुणे आणि शिरूरचा सहा पदरी उड्डाण मार्गाला जोडला जणार समृद्धी महामार्ग; कोठून पाहा…

छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा मॅप व्हायरल…

Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…