मुख्य बातम्या

शिरूरमध्ये सत्ता भाजपची पण नगराध्यक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा…

शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी बाजी मारली असून ऐश्वर्या अभिजित पाचर्णे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पालिकेतील सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असतानाही नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. त्यामुळे शिरूर नगरपालिकेत एकीकडे भाजपची संख्याबळावर सत्ता, तर दुसरीकडे नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे अशी वेगळी राजकीय स्थिती निर्माण झाली आहे.

नगराध्यक्षपदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात होते. भाजपकडून सुवर्णा लोळगे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कडून ऐश्वर्या पाचर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) कडून अलका खांडरे, शिवसेना (शिंदे गट) कडून रोहिणी बनकर, तर अपक्ष म्हणून माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी निवडणूक लढवली होती. या चुरशीच्या लढतीत ऐश्वर्या पाचर्णे यांनी ८,७९९ मते मिळवत स्पष्ट विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या अलका खांडरे यांना ६,८८४ मते मिळाली, तर भाजपच्या सुवर्णा लोळगे ६,७४२ मतांवर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मुज्जफर कुरेशी, शिवसेना (ठाकरे गट) शहरप्रमुख माजी नगरसेवक संजय देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) शहराध्यक्ष शरद कालेवार यांच्या पत्नी मनीषा कालेवार, तसेच माजी नगरसेविका सुरेखा शितोळे, विनोद भालेराव, रेश्मा लोखंडे यांचा पराभव झाला. मात्र विद्यमान नगरसेवक नितीन पाचर्णे आणि संगीता मल्लाव यांनी विजय मिळवला.

नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी तब्बल ९८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. विशेष बाब म्हणजे शिरूर नगरपालिकेची निवडणूक प्रथमच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत पक्षचिन्हांवर लढवली. यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर ऐनवेळी पक्षांतर झाले. काही उमेदवारांचे पक्षांतर यशस्वी ठरले, तर काहींना पक्ष बदलूनही पराभव पत्करावा लागला.

पक्षनिहाय विजयी उमेदवारांची संख्या
भारतीय जनता पक्ष (भाजप) – ११
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – ७
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – ५
शिवसेना (ठाकरे गट) – ०
शिवसेना (शिंदे गट) – ०
अपक्ष – १

भाजपकडून नितीन पाचर्णे, सुनीता भुजबळ, संतोष थेऊरकर, सागर नरवडे, पूजा पोटावळे, अमित कर्डीले, उमेश शेळके आदी उमेदवार विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून संगीता मल्लाव, सुनील जाधव, स्वाती साठे यांच्यासह सात जण निवडून आले, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाकडून रवी ढोबळे यांच्यासह पाच जण विजयी झाले.

एकूणच शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न देता संमिश्र कौल दिला आहे. भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असले तरी नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे गेल्याने आगामी काळात शिरूर नगरपालिकेतील राजकारण अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

10 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

10 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

10 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

16 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

16 तास ago