मुख्य बातम्या

शिरुर; घोड धरणाची वाळू माफीयांनी लावलीये वाट; रात्रंदिवस वाळू उपशाचा घातलाय घाट

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणातुन गेल्या एक वर्षापासुन वाळू डेपोच्या नावाखाली बेसुमार वाळू उपसा चालु असुन शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत असताना महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असुन या वाळू उपशामुळे पुर्णपणे मातीचे धरण असलेल्या घोड धरणाला भविष्यात हानी पोहचण्याची शक्यता आहे.

 

शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील कुऱ्हाडवाडी तसेच चिंचणी या ठिकाणाहुन सध्या रात्रंदिवस वाळू माफिया यांत्रिक बोटीद्वारे वाळू उपसा करत आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असल्याने पोलिस आणि महसूल कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने वाळू माफिया मोकाट सुटले असुन चिंचणी येथील घोड धरणाच्या अगदी जवळच धोकादायकरीत्या वाळू उपसा केला जात आहे.

 

वाळू माफीयांचा एकच नारा अपना सपना मनी मनी…

शिरुरच्या पुर्वभागात चिंचणी येथे वाळू डेपोच्या नावाखाली स्थानिक वाळू माफिया बेसुमार वाळू उपसा करत असुन चिंचणी, गुनाट, कुऱ्हाडवाडी येथे नवीन वाळू माफिया उदयास येत असुन भविष्यात याठिकाणी वाळू उपशासाठी जीवघेणा संघर्ष होणार असुन त्यामुळं भविष्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार आहे. परंतु पैशाच्या हव्यासापोटी पोलिस आणि महसूल कर्मचारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या मार्च एंड चालु असल्याने पोलिस व महसूल कर्मचारीही ‘अपना काम बनता तो भाड मे जाय जनता’ असे म्हणतं वसुलीत मग्न झाले आहेत.

(क्रमश:)

शेतकऱ्यांच्या सोसायटीचा भरणा करण्यासाठी धावून आले चेअरमन; बापुसाहेब शिंदे यांची शेतकऱ्यांना आर्थिक मदत

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

1 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

1 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago