मुख्य बातम्या

टाकळी हाजी औटपोस्टमध्ये पोलीस अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाणे अंतर्गत टाकळी हाजी पोलीस औटपोस्ट हद्दीतील गावांमध्ये अवैध धंदे, चोरी, अपघात आणि हाणामारीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासनाचे उघड दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे.

औटपोस्टसाठी नेमणुकीवर असलेले अधिकारी प्रत्यक्षात टाकळी हाजी येथे फिरकतच नसून ते शिरूरमध्येच बसत असल्याने अनेकांना गुन्हा नोंदवण्यासाठी शिरूरला धाव घ्यावी लागत आहे. परिणामी “औटपोस्टवर अधिकारी दाखवा अन् बक्षीस मिळवा!” अशी उपरोधिक चर्चा गावागावांत रंगू लागली आहे.

गेल्या काही दिवसांत चोऱ्या, घरगुती वाद, हाणामाऱ्या या घटना वाढल्या असून परस्परविरोधी गुन्हे नोंदवण्याचे प्रमाणही वाढत आहे. यामागे राजकीय हस्तक्षेपाची छाया असल्याच्या चर्चा असून खऱ्या दोषीची ओळखच धूसर होते आहे. त्यामुळे अन्यायग्रस्त नागरिकांना न्यायासाठी याचना कराव्या लागत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून टाकळी हाजी औटपोस्टचे पोलीस वाहन बिघडल्याने रात्र गस्त ठप्प झाली आहे. किरकोळ दुरुस्ती करायची कोणी यासाठी अधिकारी व कर्मचारी एकमेकांकडे बोट दाखवत आहे. मात्र कोणीच पुढाकार घेत नसल्याने रात्र गस्त ठप्प झाली असून पोलिसिंग शिल्लक नसल्याने गुन्हेगारांसाठी मोकळे मैदान तयार झाले आहे. अवैध व्यवसायांचा गोरखधंदा बेधडक सुरू आहे. “हे पोलिसांना दिसत नाही का? की हेतुपुरस्सर दुर्लक्ष?” त्यामुळे कायदा सुव्यवस्था ढासळली असून बेट भागातील नागरिकांचे पोलीस प्रशासनावरचे समाधान आता पूर्णपणे ढासळले असून तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक आता टाकळी हाजी औटपोस्टला दबंग व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी देतील का? की ‘आवो-जावो घर तुम्हारा’ अशीच स्थिती कायम राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

8 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago