अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक
शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील करंजेनगर परिसरातील मोकळ्या मैदानातील झुडपात पोत्यामध्ये आढळलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाचे गूढ शिक्रापूर पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही तासांत उलगडले. अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटनेच आपल्या मित्राचा गळा दाबून खून केल्याचे, तर आरोपीच्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी मुकेश विठ्ठल सोनवणे (वय १९) आणि त्याची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय १९) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव उर्फ अक्षय अशोक वायकर (वय २४, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) याचा २४ ते २६ जुलैदरम्यान खून करण्यात आला. २६ जुलै रोजी दुपारी करंजेनगर येथील मोकळ्या मैदानातील झुडपात पोत्यामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख पटत नसल्याने शिक्रापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सोशल मीडियावर मृताचे छायाचित्र प्रसारित करण्यात आले तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले. त्यानंतर मृताची ओळख गौरव उर्फ अक्षय वायकर अशी पटली.
तपासादरम्यान गौरव हा करंजेनगर येथे मुकेश सोनवणे आणि त्याची पत्नी जान्हवी पाटोळे यांच्यासोबत राहत असल्याची माहिती समोर आली. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
चौकशीत मुकेश सोनवणे याने अनैतिक संबंधाच्या संशयातून गौरवचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पत्नी जान्हवीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून करंजेनगर येथील निर्जन झुडपात टाकल्याचेही उघड झाले.
मयताची आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि शिक्रापूर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. शिक्रापूर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वेगवान तपास करून आरोपींना जेरबंद केले. या तपासात शिक्रापूर येथील आपदा टीमचे शेरखान शेख यांनीही मोलाची मदत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत आहेत.
शिरूर तालुक्यात महाविद्यालयीन प्रेमीयुगलाची गळफास घेऊन आत्महत्या…
शिरूर तालुक्यात पेट्रोल टाकून प्रेत जाळणारे गजाआड; प्रेमसंबंधातून खून…
शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…
शिरूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; दुचाकी चोरीचे वाढले प्रमाण…
प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…