उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा प्रकल्पांचाही शुभारंभ
ठाणे: ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी पार पडले. सुमारे ₹२०० कोटींच्या या प्रकल्पामुळे पुढील दीड वर्षांत तीन हात नाका परिसरातील वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्प, विविध रस्ते व पायाभूत सुविधा तसेच यशवंत रामा साळवी आंतरराष्ट्रीय तरण तलाव व क्रीडा संकुलाच्या कामांचाही शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री असताना मंजूर झालेला हा प्रकल्प आता प्रत्यक्षात साकार होत असल्याचे सांगताना एकनाथ शिंदे यांनी, अत्याधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तीन हात नाक्यावरील सातपैकी चार प्रमुख वाहतूक प्रवाह सिग्नलमुक्त करण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे वाहनचालकांचा वेळ, इंधन आणि श्रमाची बचत होईल, असा दावा त्यांनी केला.
विकासकामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना देत, “विकास हा घोषणांचा नव्हे तर कृतीचा विषय आहे,” असे शिंदे म्हणाले. ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, एलिव्हेटेड रोड, मेट्रो, पॉड टॅक्सी आणि इतर वाहतूक प्रकल्पांमुळे भविष्यात ठाण्याची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी नमूद केले.
इंदिरानगर–रूपादेवीपाडा जलपुरवठा प्रकल्पामुळे ५२ एमएलडी क्षमतेचा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून अनेक भागांतील नागरिकांचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच रूपादेवी मंदिर परिसर आणि हँगिंग गार्डनच्या सुशोभीकरणासाठी ₹३० कोटींची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड, महापौर शर्मिला पिंपळोलकर, तसेच महायुतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…