शिरुर (तेजस फडके) कवठे येमाई (ता. शिरुर) येथे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि शिरुर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ६० किलो गांजा जप्त करत एका चारचाकी वाहनासह पोपट विठ्ठल शितोळे (वय ५२) याला ताब्यात घेतल्याने शिरुर तालुक्यातील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, या कारवाईनंतर आता या गांजा प्रकरणाचे धागेदोरे श्रीगोंदा तालुक्यापर्यंत पोहोचत असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
शिरुर तालुक्यात सापडलेला ६० किलो गांजा हा काही किरकोळ साठा नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची वाहतूक करण्यासाठी केवळ एकच व्यक्ती होता की त्यामागे पुरवठादार, वाहतूकदार, विक्रेते आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारे मोठे नेटवर्क कार्यरत आहे, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असले तरी या गांजाचा मालक कोण? पुरवठा कुठून झाला? तो नेमका कुठे जाणार होता? या व्यवहारामागे आणखी कोण कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या साखळीच्या मुळापर्यंत तपास पोहोचणार का?
या कारवाईनंतर कवठे येमाई सह शिरुर तालुक्यात ‘श्रीगोंदा कनेक्शन’ची दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार श्रीगोंदा तालुक्यातील असल्याची चर्चा असली, तरी तपास अधिकाऱ्यांनी मात्र त्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे पोलिस तपासात या चर्चेची सत्यता कितपत आहे, हे स्पष्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शिरुर तालुक्यात यापुर्वीही अमली पदार्थांच्या व्यवहारांबाबत कारवाया झाल्या आहेत. त्यामुळे कवठे येमाईतील ६० किलो गांजा जप्तीची कारवाई ही केवळ ‘एक आरोपी पकडला आणि प्रकरण संपले’ अशा पद्धतीने थांबता कामा नये. या कारवाईच्या निमित्ताने शिरुर तालुक्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या संपुर्ण साखळीचा छडा लावण्याची संधी पोलिसांना मिळाली आहे.
विशेषतः मोठ्या प्रमाणातील गांजा कोणाच्या माध्यमातून शिरुरमध्ये पोहोचला, त्यासाठी वाहन कोणाचे वापरले गेले, आर्थिक व्यवहार कसे झाले, यापुर्वी अशा प्रकारच्या मालाची वाहतूक झाली आहे का आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोण सहभागी आहेत, याचा तपास होणे गरजेचे आहे.
हि कारवाई करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांकडून आता केवळ जप्त केलेल्या गांजाचे वजन आणि अटक केलेल्या व्यक्तीपुरती माहिती न राहता, या अमली पदार्थांच्या साम्राज्याचा ‘मुख्य सूत्रधार’ शोधून काढला जातो का…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कारण ६० किलो गांजा विक्रीला येण्यापूर्वी त्यामागे अनेक हात काम करत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एका व्यक्तीवर कारवाई न करता यां प्रकरणात संपुर्ण पाळेमुळे शोधून त्यावर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आता खरी कसोटी पोलिसांच्या पुढील तपासाची आहे. कवठे येमाईतील गांजा नेमका कुठून आला आणि त्याचे धागेदोरे कुठपर्यंत जातात…? श्रीगोंदा कनेक्शनच्या चर्चेत कितपत तथ्य आहे…? आणि या व्यवहारामागचा खरा सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात अडकणार का…? या सर्व बाबी पोलिसांच्या तपासा दरम्यान उघड होतील अशी सर्वसामान्य जनतेला अपेक्षा आहेत.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…