शिरुर (अरुणकुमार मोटे) राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र.१ च्यावतीने शिरुर तालुक्यातील शिक्रापुर गावातील वेळ नदीकाठी अवैधरित्या गावठी दारुनिर्मिती करणाऱ्या अड्ड्यावर कारवाई करुन १ हजार ३०० लिटर रसायन व ७० लिटर गावठी दारु असा ५९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी अरमान कंकराज बिरावत याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र. १. पुणे पथकाचे निरीक्षक देवदत्त पोटे, दुय्यम निरीक्षक डी. एस. सुर्यवंशी तसेच जवान सूरज घुले, जयराम काचरा, मुकुंद पोटे, शरद हांडगर, शाहिन इनामदार यांनी सहभाग घेतला.
सर्वसामान्य नागरिकांना अवैध मद्य निर्मिती, विक्रीबाबत माहिती मिळाल्यास राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केले आहे.
शिरुर; रांजणगाव येथील अथर्व ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला
कारेगाव येथील मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा ‘रणरागिणी पुरस्कार २०२४’ ने सन्मान
लिंबू आणि लवंग या दोन्ही गोष्टींचा वापर कशात ना कशात रोज भारतीय घरांमध्ये केला जातो.…
संधीवात, ज्यास इंग्रजीत Arthritis म्हटले जाते. ज्यात सांध्यात सूज आणि तीव्र वेदना होतात. शरीरातील रोगप्रतिकारक…
जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची…
नागपूर: राज्यातील दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी…
मुंबई : मराठवाड्यासह महाराष्ट्रातील अनेक भागांत अपुरा व विस्कळीत पाऊस, पावसातील दीर्घ खंड, घटलेली मृदा…
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; तूर, सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान अकोला: कमी पर्जन्यमान आणि पावसातील प्रदीर्घ खंडामुळे…