शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे अष्टविनायक मार्गावर शनिवार (दि. ५) कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही रस्त्यावर कोयता घेवून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे. तरीही कोणतीही भीती मनात न बाळगता असे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
शिंदेवाडी येथील दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादाच्या कारणास्तव शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून बारा वर्षापूर्वी संजय रखमा शिंदे याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता. संजय शिंदे हा चार वर्ष येरवडा कारागृहात होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना या युवकाने हातात कोयता वर करून अष्टविनायक मार्गावर 3 ते 4 वेळा चकरा मारून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
कोयता दाखवत दहशत, दमदाटी व शिवीगाळ केली म्हणून शिंदेवाडी येथील भानुदास ज्ञानोबा शिंदे यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल केल्याने टाकळी हाजी पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरिक्षक सुनिल उगले यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपीस अटक केली.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…