मुख्य बातम्या

रांजण खळग्यात पाय घसरुन पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर सापडला 

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून रांजणखळग्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह तब्बल ३८ तासांनंतर गुरूवारी (दि. १०) सकाळी सापडला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पद्माबाई शेषराव काकडे (रा. मोहगव्हाण ता. कारंजा) ही ५५ वर्षीय महीला नातेवाईकांसोबत रांजण खळगे पाहत असताना तिचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात पडली होती. तिला वाचविण्यासाठी तिचे जावई महेंद्र शहादेव औताडे यांनी पाण्यात उडी घेतली. काही अंतरापर्यंत त्यांनी महिलेला पकडले. मात्र नंतर पाण्याच्या वेगामुळे खाली खोलातील खड्ड्यात महिला गेल्याने तिची साडी औताडे यांच्या हातात राहिली होती. सोबत असलेल्या नातेवाईकांनी आरडा ओरडा केल्यामुळे स्थानिकांनी तिकडे धाव घेत महेंद्र औताडे यांना पाण्यातून बाहेर ओढले. मात्र महिलेचा तपास लागला नाही.

पर्यटकांनी रांजण खळगे पाहण्यासाठी आल्यानंतर फोटोसेशन करताना किंवा पर्यटनाचा आनंद लुटताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 दिवस ago

शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज भैरवनाथ पतसंस्थेत नेमकं चाललंय काय…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या…

2 दिवस ago

मला दम देण्यापेक्षा दादांनी कांद्याला आणि दुधाला चांगला बाजारभाव द्यावा; अशोक पवारांचं प्रत्युत्तर

शिरुर (तेजस फडके) अजित पवार हे फार मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे.…

2 दिवस ago

‘अरे पठ्या तु आमदारचं कसा होतो ते बघतो’… अजित पवारांचं अशोक पवारांना खुलं आव्हान

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या शिरुर लोकसभा…

3 दिवस ago

जागरुक आणि चांगल काम करणारा लोकप्रतिनिधी असेल तर प्रश्न सुटतात; शरद पवार

शिरुर (तेजस फडके) राजकारण करत असताना सत्ता आवश्यक असते असे नाही. सत्ता नसताना ही जागरुक…

3 दिवस ago

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

5 दिवस ago