मुख्य बातम्या

शिरुरच्या सराफावर बंदुकीने हल्ला करणाऱ्यांना पोलीसांनी केली अटक

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात असणाऱ्या जगन्नाथ कूलथे सराफ पेढीवर दोन दिवसांपूर्वी दोघा तरुणांनी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या प्रयत्न केला होता. त्यावेळी या पेढीचे मालक अशोक कुलथे हे स्वतः दुकानात होते. त्यांच्या सोबत कामगार भिकाजी पंडित (वय ५०) हे कामगार देखील होते. रात्री दुकान आवरण्याची लगबग सुरु असताना अचानक दोघे तरुण दुकानात शिरले आणि बंदुकीचा धाक दाखवत दरोड्याच्या तयारीत असतानाच, भिकाजी पंडित यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जोरदार प्रतिकार करत या दोघांना दुकानाबाहेर लोटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे यातील एकाने बंदुकीतून फायरिंग केली. त्यामुळे परिसरातील लोक भयभीत होऊन सैरावैरा पळू लागले होते.

ही घटना घडताच काही क्षणांत शिरुर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, अभिजित पवार, पोलिस हवालदार प्रफुल्ल भगत, तसेच पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, हवालदार जनार्दन शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.त्यावेळी व्यापारी बांधव व अशोक कुलथे यांचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येने जमा झालेला होता. अशोक कुलथे यांनी शिरुर पोलीस स्टेशनला रीतसर या घटनेची फिर्याद दिलेली होती. पोलिसांनीही सर्व लोकांना आरोपी लवकरात लवकर पकडून देऊ असे आश्वासन दिलेले होते.

त्यानंतर सदर आरोपी हे पुण्याजवळील सिंहगड परिसरातील जंगलात लपले असल्याचे लोकेशन पोलिसांना मिळाल्याने, पोलिसांनी अथक परिश्रमाने दोघांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी एकजण शिरुर मधील काचे आळीतील असून त्याचे नाव शरद बन्सी मल्लाव (वय २४) तर त्याचा दुसरा साथीदार पुणे येथील वडगाव धायरी मधील असून, त्याचे नाव सागर उर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर (वय २३) हे दोघेही रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून, मल्लाव हा पुणे जिल्हा तसेच नगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून हद्दपार आहे.

 

आरोपी मल्लावकडून पोलिसांनी तीन गावठी पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. शरद मल्लाव ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याचा साथीदार सागर (बबलू) सोनलकर जखमी असल्याने पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत असून, त्यालाही पोलीस ताब्यात घेणार आहेत.

 

सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी साो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, प्रदीप चौधरी, अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, सचिन घाडगे, अतुल डेरे, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, अजित भुजबळ, अक्षय नवले, संदीप वारे, अक्षय सुपे तसेच शिरुर पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई यांनी केली आहे. आरोपीला सध्या पोलीस कोठडीमध्ये असून पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातही पोर्शे पॅटर्न, पोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीच्या हातात चारचाकी; धडक बसल्याने एकाचा मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

9 तास ago

बापरे! पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; मतमोजणीपूर्वी बदली करा…

निवडणूक आयोगाला पत्र; प्रांताधिकाऱ्यांच्या आरोपाने जिल्हयात मोठी खळबळ! शिरूर (अरुणकुमार मोटे): पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे…

1 दिवस ago

शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नागरीकांचे प्रश्नचिन्ह लागले ऊमटू…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह बेट भागात गेल्या दोन वर्षापासून विद्युत रोहीत्र चोरीचे सत्र सातत्याने…

1 दिवस ago

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि.…

2 दिवस ago

Video; पारोडी गावातील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राला कायमच टाळं ; रुग्णालय वारंवार बंद तर डॉक्टर सतत गैरहजर…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील पारोडी येथील सरकारी आरोग्य उपकेंद्र कायमच बंद अवस्थेत आढळून येत…

2 दिवस ago

शिरुर; वाळूमाफिया आणि माती चोरांसाठी हवेलीतील बड्या नेत्याचा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव…?

शिंदोडी (तेजस फडके) सध्या पुण्यातील हिट अँड रण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा असुन एका बड्या…

2 दिवस ago