मुख्य बातम्या

शिरुर तालुक्याचे राजकारण नवीन वळण तर घेणार नाही ना?

राष्ट्रवादीच्या आबाराजे मांढरेंच्या कार्यक्रमाला प्रदीप कंदांची उपस्थिती

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे यांच्या पत्नी कुसुम मांढरे यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच तेथील एखाद्या समितीचे सभापतीपद आणि स्वतः आबाराजे मांढरे यांना बाजार समितीचे सभापतीपद देऊ, असे शब्द मिळूनही 5 वर्षात काहीच न दिल्याने मांढरे दाम्पत्यांची नाराजी उघडपणे दिसू लागलीय असून मांढरे यांच्या एका कार्यक्रमात त्याचाच प्रत्यय आला असून भारतीय जनता पार्टीकडून शिरुर हवेलीचे संभाव्य उमेदवार समजले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद या कार्यक्रमासाठी आमदार अशोक पवार यांचे कट्टर विरोधात भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्यासह उपस्थित राहिल्याने आबाराजे मांढरे भाजपच्या वाटेवर आहे कि काय अशी चर्चा शिरुर तालुक्यात रंगली आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 महिन्यांपूर्वी शाळेच्या 8 वर्गखोल्यांचे उद्घाटन आमदार अशोक पवार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले असताना जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे गैरहजर होते, तर यापूर्वी घोडगंगा साखर कारखान्याच्या प्रचारामध्ये देखील दोघे सक्रीय नव्हते याबाबत अनेक चर्चा रंगल्या असताना याविषयावर आपण योग्य वेळी बोलू असे मांढरेंनी सांगितले होते.

सध्या शिक्रापूरच्या स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्राचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला, सुमारे आठ ते दहा हजार भाविकांच्या उपस्थितीतील सलग 3 दिवसांच्या या कार्यक्रमाचे नियोजन मांढरे दांपत्याने केले होते. मात्र सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे कोणी मोठे पदाधिकारी आले नसताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच शिरुर हवेली विधानसभेचे संभाव्य उमेदवार समजले जाणारे प्रदीप कंद, भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, काका खळदकर हे हजर झाले.

दरम्यान त्यांचे विशेष सत्कार आबाराजे मांढरे व कुसुम मांढरे यांनी केले. तर कंद आणि मांढरे यांची कानात झालेली कुजबुज या धार्मिक कार्यक्रमातही चर्चेचा विषय राहिली. तर यापूर्वी शिक्रापूरच्या राजकारणात माजी सभापती मंगलदास बांदल यांना थोपविण्यासाठी मांढरे यांना राष्ट्रवादीकडून बरीच रसद पुरविली गेली अन मांढरेंनीही आपले प्रस्थ या भागात तयार केले. मात्र बांदलांवरील कारवाईनंतर मांढरेंना दिल्या गेलेल्या शब्दाप्रमाणे कुसुम मांढरेंना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद वा एखाद्या समितीचे सभापतीपद दिले गेले नाही.

याशिवाय आबाराजे मांढरे यांना शिरुर बाजार समितीचे सभापतीपद दिले गेले नाही. त्यामुळे मांढरे नाराज असल्याचे उघड दिसत असून त्यांची पुढील राजकीय भूमिका भाजपाच्या दिशेने सुरु झालीय का अशी चर्चा शिरुर तालुक्यात रंगत असताना याचे उत्तर देखील पुढील काळात कळणार आहे. मात्र मांढरे आणि बांदल दोन्ही गट राष्ट्रवादीच्या विरोधात राहिल्यास शिक्रापूर, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे तसेच कोरेगाव भिमा या गावांतील अंतर्गत राजकारणाच्या निमित्ताने राष्ट्रवादीसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा असणार आहे.

योग्य वेळ जवळ येतीय हेच सांगतो; आबाराजे मांढरे

माझ्यामध्ये असलेल्या राजकीय क्षमता मी सिध्द करुन दाखविलेल्या आहेत. माझ्याकडून झालेला प्रदीपदादा कंद यांचा सत्कार याचे फार अर्थ कुणी लावू नये. मात्र मी किती आणि कसा निर्णायक आहे हे दाखवून देण्याची वेळ जवळ येत चाललीय एवढेच मी सांगतो असे आबाराजे मांढरे यांनी सांगितले.

मंगलदास बांदलांचा जामिन आणि मांढरेंची जुळवणूक नेमके काय?

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तसेच जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे नेते मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयात जामिन मंजुर झाला असून ते लवकरच बाहेर येतील, या काळात कधीकाळी बांदलांचे अगदी जिवलग मित्र राहिलेले आबाराजे मांढरे यांनी राष्ट्रवादीला सुचक इशारा देत भाजपाच्या कंदांना कार्यक्रमासाठी पाचारण करुन त्यांना सन्मानित करणे हे समिकरण शिरुर तालुक्याच्या राजकारणासाठी खुप मोठी घडामोड करणारे ठरणारे असून बांदल, कंद व मांढरे यांचेशी घनिष्ठ असलेले शिरुर तालुक्यातील अनेक पदाधिकारी राष्ट्रवादीत सक्रीय असून ते सर्व खांब ढिले करण्याचे काम आबाराजे मांढरे व प्रदीप कंद यांच्या भेटीने यापुढील काळात होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी दिले खुले आव्हाण…

एका रात्रीत केली तीन विद्युत रोहीत्रांची चोरी सविंदणे (अरूणकुमार मोटे): शिरूर पोलिसांच्या संयुक्त बैठकीला चोरट्यांनी…

6 तास ago

शिरुर; चारचाकी गाड्यांना अनधिकृत पाट्या तसेच अवैध दारुविक्रीबाबत मातंग नवनिर्माण सेना आक्रमक…

शिरुर (तेजस फडके) पुणे जिल्ह्यात तसेच शिरुर तालुक्यातील अनेकजण महाराष्ट्र शासन, आमदार, पोलिस, प्रेस तसेच…

1 दिवस ago

शिक्रापुर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त…

शिरुर (अरुणकुमार मोटे) राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्र.१ च्यावतीने शिरुर तालुक्यातील शिक्रापुर गावातील वेळ…

1 दिवस ago

शिरुरच्या बेट भागात वाढत्या रोहीत्र, केबल चोऱ्या अवैध धंद्यांच्या पार्श्वभुमीवर पोलीस,महावितरणची संयुक्त बैठक

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरच्या बेट भागातील मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, सविंदणे परिसरात सातत्याने होणाऱ्या…

1 दिवस ago

शिरुर; रांजणगाव येथील ‘अथर्व ज्वेलर्स’ या दुकानाचे शटर उचकटून १६ लाख २५ हजारांचे दागिने चोरीला…

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथील भांबार्डे रस्त्यावरील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी असणारे…

1 दिवस ago

कारेगाव येथील मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा ‘रणरागिणी पुरस्कार २०२४’ ने सन्मान

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कारेगाव (ता. शिरुर) येथील 'AJ ब्युटी पार्लर' च्या सर्वेसर्वा मेकउप आर्टिस्ट…

2 दिवस ago