रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) कारेगाव (ता. शिरुर) येथील ‘AJ ब्युटी पार्लर’ च्या सर्वेसर्वा मेकउप आर्टिस्ट अश्विनी जाधव यांचा मंगळवार (दि ११) रोजी पुणे येथे ‘रणरागिणी २०२४ पुरस्कारा’ ने नुकताच सन्मान करण्यात आला. गेल्या तीन वर्षांपासुन कारेगाव सारख्या ग्रामीण भागात त्यांनी स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु करुन अनेक फॅशन इव्हेंट मध्ये ‘मेकउप आर्टिस्ट’ म्हणुन त्यांनी सहभाग नोंदवला असल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ‘AJ मेकअप आणि हेअर स्टुडिओ’ नावाने त्यांचा स्वतःचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील महिलांचा मेकउप करतानाच त्यांनी शॉर्ट फिल्म, वेबसिरीज तसेच सिनेसृष्टीतील काही अभिनेत्री तसेच अभिनेत्यांचाही मेकअप केलेला आहे. तसेच पुण्यात होणाऱ्या अनेक फॅशन शो मध्ये त्यांनी मेकउप आर्टिस्ट म्हणुन त्यांनी काम केले असल्यामुळे त्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘रणरागिणी पुरस्कार २०२४’ ने सन्मानित करण्यात आले.
माझ्या या यशात माझ्या सर्वच कुटुंबातील व्यक्तींचा मोठा वाटा आहे. त्यांचा मला कायमच पाठिंबा मिळाला असुन माझ्या या तीन वर्षाच्या संपुर्ण वाटचालीत सुरवातीपासुनच मला माझ्या कुटुंबातील सर्वच व्यक्तीं माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या कुटुंबियांना मी समर्पित करते.
अश्विनी जाधव (मेकअप आर्टिस्ट)
AJ मेकअप आणि हेअर स्टुडिओ, कारेगाव
कारेगावच्या उद्योजिका अश्विनी जाधव महिला दिनानिमित्त वुमन स्टार रायझिंग अवार्डने सन्मानित
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…