मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात दरोडा टाकुन रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्याची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील गणेगाव खालसा येथील पद्मावती वस्ती येथे गुरुवार (दि 15) रोजी पहाटे 3 च्या सुमारास 30 ते 35 वर्षाच्या अनोळखी व्यक्तींनी घराचा दरवाजा उचकटुन त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करत, कोयता आणि कु-हाडीचा धाक दाखवत 30 हजार रोख रक्कम तसेच सोन्याच्या दागिन्यासह 2 लाख 23 हजार रुपयांची चोरी करुन पोबारा केला आहे.याबाबत संजय मोतीराम पवार (वय 32) रा. गणेगाव खालसा, पद्माकर वस्ती, ता. शिरुर, जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि 15) रोजी पहाटे तीनच्या सुमारास चार अज्ञात व्यक्ती संजय पवार यांच्या घराचा दरवाजा उचकटून आत शिरले. त्यांनी हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करत, कोयता आणि कु-हाडीचा धाक दाखवत फिर्यादी यांच्या पत्नी पुष्पा यांच्या गळयातील आणि कपाटातील सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील झुंबर, अंगठया, मणिमंगळसुत्र, लहान मुलांचे चांदीचे दागिने आणि 30 हजार रोख रकमेसह 2 लाख 23 हजार रुपयांची चोरी केली आहे. रांजणगाव MIDC चे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago