शिरुर (तेजस फडके) वाडागाव पुनर्वसन (ता. शिरुर) येथील वाडागाव-डिंग्रजवाडी रस्त्यावरुन दुचाकीहून जात असताना दुसऱ्या दुचाकीची धडक बसून महादेव दत्तात्रय कांबळे व सिद्धेश शिंदे या दोघांचा मृत्यू तर ओंकार चंद्रकांत कंदारे हा युवक जखमी झाल्याची घटना घडली असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वाडागाव (ता. शिरूर) येथील वाडागाव डिंग्रजवाडी रस्त्यावरुन महादेव कांबळे व सिद्धेश शिंदे हे दोघे त्यांच्या एम एच १२ जि. पी. २०३६ या दुचाकीहून जात असताना ओंकार कंदारे हा युवक त्याच्या दुचाकीहून भरधाव वेगाने आला. त्यावेळी त्याची धडक महादेव कांबळे यांच्या दुचाकीला बसून अपघात झाला. त्यात महादेव दत्तात्रय कांबळे (वय १४ वर्षे) रा. कोरेगाव भीमा ( पंढरीनाथ नगर) याचा जागीच मृत्यू झाला तर सिद्धेश बाळासाहेब शिंदे (वय १७ वर्षे) याला उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
तसेच ओंकार चंद्रकांत कंदारे रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे हा जखमी झाला असून याबाबत अमोल महादेव कांबळे (वय ३३ वर्षे) रा. कोरेगाव भीमा (पंढरीनाथ नगर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ओंकार चंद्रकांत कंदारे या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहेत.
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…