शिरूर तालुका

उरळगाव येथे ऊस, आंबा, नारळाची झाडे पेटविल्याने आर्थिक नुकसान

शिरुर (तेजस फडके) उरळगाव (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीने स्वतःच्या शेतातील गवत पेटविताना काळजी न घेतल्याने शेजारील शेतकऱ्याच्या शेतातील उसाचे पिक, आंब्याची आणि नारळाची झाडे पेटविल्याने मोठे नुकसान झाले असुन याबाबत संगिता पोपट काळे (वय ३७) रा. उरळगाव ता. शिरुर जि. पुणे यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन दत्तात्रय शंकर बांडे या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय बांडे यांनी (दि 31) मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास स्वतःच्या शेतातील गवत पेटविल्याने जमिन गट नं.77/2 मध्ये असणाऱ्या शेतातील ऊस, तसेच नारळ आणि आंब्याची झाडे जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच शेजारील अर्जुन विठोबा काळे यांचे चिकुच्या झाडाला आग लागून नुकसान झाले आहे. शिरुर पोलिसचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चव्हाण हे पुढील तपास करत आहेत.

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

4 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

4 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

4 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago