मुख्य बातम्या

कोरेगाव भीमा येथे मध्यरात्री स्विफ्ट कारच्या भीषण अपघातात दोन तरुण जखमी

शिरुर (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील भीमानदीच्या पुलावरील उजव्या बाजूकडील वळणावर पहाटे तीनच्या सुमारास एका स्विफ्ट गाडीचा भीषण अपघात झाला. पुणे-नगर महामार्गापासून गाडी साधारणतः पन्नास ते साठ फूट खाली खड्ड्यात वेगाने पलटी झाली. यावेळी एअर बॅग ओपन झाल्याने गाडीतील दोन तरुणांचे प्राण वाचले मात्र अपघातात हे दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असुन त्या तरुणांना ग्रामस्थांनी अक्षरशः काच फोडून बाहेर काढत जीवदान दिले आहे.

कोरेगाव भीमा येथे पुण्याकडून नगरकडे जाणाऱ्या बाजूने रात्री साडेतीनच्या सुमारास वेगाने एक स्विफ्ट (MH १२ TK ३९७६) वळणाचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला वेगात खाली गेली. यावेळी गाडीने पलटी खाल्ली व पन्नास ते साठ फूट गाडी खाली घसरत गेली. यावेळी गाडीच्या पुढील भागातील एअर बॅगा ओपन झाल्या होत्या. पलटी झालेल्या गाडीतील एका तरुणाची मान खिडकीच्या काचेत अडकली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते खंडू चकोर, प्रवीण अशोक कोल्हे व आणखी दोन नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी तरुणांचा जीव वाचवला.

या अपघातात ऋषिकेश यादव (वय ३५) शिरूर,एकनाथ शिंगाल (वय ३३) रा.वाघोली हे जखमी झाले असून शिक्रापूर येथील लंघे हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

…अन रुग्णवाहीकेला पाऊणतास उशीर 

कोरेगाव भीमा येथील अपघात स्थळी मदतीसाठी गेलेल्या खंडू चकोर यांनी सांगितले की तरुणांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी १०८ नंबरवर कॉल केला होता. त्यावेळी पाऊण तासाने अँब्युलन्स आली याचे कारण अँब्युलन्स वाहकाला विचारले असता गाडीच्या खराब पाठ्यांचे कारण देत यायला उशीर झाल्याचे सांगण्यात आले. जर अपघातात जखमी झालेल्यांना वेळेवर मदत मिळणार नसेल व पाऊण तास वाट पाहावी लागणार असेल तर १०८ च्या सेवेविषयी बोलायचं काय ? आणि कोणाच्या भरवश्यावर रुग्णांनी राहायचे असा प्रश्न पडत असून आता १०८ स्वतःची सुविधा वेळेत उपलब्ध करून देणार की रुग्णांच्या जीवाशी खेळ होणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

8 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

8 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

9 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

9 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

9 तास ago